Pune Metro Sakal
पुणे

Metro Ticket : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोसाठी १० ते ३० रुपये तिकिट!

मेट्रोच्या विस्तारीत मार्गांचे येत्या मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) रोजी उदघाटन झाल्यावर जवळपास पीएमपी बसच्या तिकिटातच प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मेट्रोच्या विस्तारीत मार्गांचे येत्या मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) रोजी उदघाटन झाल्यावर जवळपास पीएमपी बसच्या तिकिटातच प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. वनाज ते रूबी हॉल मार्गांसाठी २५ रुपये तर, पिंपरी चिंचवड- शिवाजीनगर न्यायालय दरम्यानसाठी ३० रुपये तिकिट असेल. मेट्रोसाठी किमान तिकिट १० रुपये असेल.

शहरातून आता गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यान तर पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान आता थेट मेट्रो सेवेला सुरवात होईल. या पूर्वी वनाज ते गरवारे मार्गावर वाहतूक सुरू झाली होती. तिचा विस्तार आता रुबी हॉल क्लिनिकपर्यंत होत आहे.

त्यामुळे गरवारे कॉलेज ते रुबी हॉल दरम्यानच्या मार्गासाठी आता २० रुपये तिकिट असेल. तर, पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी मार्गावर सध्या मेट्रो वाहतूक सुरू आहे. आता तिचा विस्तार फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान होणार असून त्या प्रवासासाठी २५ रुपये तिकिट असेल.

मेट्रो प्रवासासाठी १०, १५, २०, २५ आणि ३० रुपये तिकिट असेल. सध्या कमाल तिकिट मर्यादा ३० रुपये आहे. वनाज ते संभाजी पूल, महापालिका भवन मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असेल तर, पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय मार्गावरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा महामेट्रो प्रशासनाचा अंदाज आहे.

या बाबत महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे म्हणाले, ‘मेट्रोचे तिकिट दर पीएमपीच्या तिकिटाच्या जवळपासच आहेत. त्यामुळे १०- २५, ३० रुपयांत प्रवाशांना वातानुकूल मेट्रोतून प्रवास करता येईल. तसेच प्रवासाचा वेळही वाचणार आहे. मेट्रोच्या तिकिट दरांची संगणकीकृत यंत्रणेत रचना करण्यात येत आहे.’

दोन्ही मार्गांवर मेट्रो २५-३० मिनिटांत धावणार

विस्तारीत मार्गांवर मेट्रो वनाज - ते रुबी हॉल दरम्यानचे अंतर २०- २५ मिनिटांत पार करेल. तर, पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यानचे अंतर २५-३० मिनिटांत पूर्ण होईल. या दोन्ही मार्गांवर मेट्रो प्रत्येक स्थानकावर किमान १ मिनिट थांबेल. प्रवाशांच्या गर्दीनुसार थांब्यावरील मेट्रोचा कालावधी कमी -जास्त होऊ शकेल, असेही सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT