Ring-Road sakal
पुणे

Ring Road : मुहूर्त लागला; आता हवी गती!

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबरोबरच पुणे महानगर क्षेत्र विकासाला चालना देणाऱ्या रिंगरोडला या वर्षात मुहूर्त लागला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबरोबरच पुणे महानगर क्षेत्र विकासाला चालना देणाऱ्या रिंगरोडला या वर्षात मुहूर्त लागला. त्यातही ‘एमएसआरडीसी’च्या (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) रिंगरोडने बाजी मारली, तर ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड मार्गी लागण्याच्या दृष्टीने पावले पडण्यास सुरुवात झाली. नवीन वर्षात दोन्ही रिंगरोडच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात भविष्यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी होण्यास सुमारे ३६ वर्षांचा कालावधी लोटला. सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या या रिंगरोडचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले. दोन टप्प्यांत होणाऱ्या या रिंगरोडच्या भूसंपादनास चार महिन्यांपूर्वी सुरुवात झाली.

पश्‍चिम भागातील रिंगरोडचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले, तर पूर्व भागातील भूसंपादनाचे काम गतीने सुरू झाले आहे. त्यामुळे सरत्या वर्षात रिंगरोड मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. नव्या वर्षात रिंगरोडसाठी निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे ‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडचे काम सुरू असताना दुसरीकडे १९८७ च्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या रिंगरोडचे काम ‘पीएमआरडीए’कडून (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या भूसंपादनाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

वर्षभरात दोन्ही शहरांच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. त्यामुळे पुणे शहराला उशिरा का होईना दोन रिंगरोड मिळणार आहेत. बाहेरून येणारी वाहतूक हद्दीत न येता परस्पर बाहेरून जाणार आहे. त्याचा मोठा परिणाम या दोन्ही शहरांतील वाहतुकीवर होऊन कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. एवढेच नव्हे, तर पुणे जिल्ह्यात नव्याने गुंतवणुकीला चालना देणारे हे दोन्ही महामार्ग ठरणार आहेत.

वाहतूक कोंडी फोडणाऱ्या आणि विकासाला चालना देणाऱ्या रिंगरोडचे काम भूसंपादनाच्या प्रक्रियेत आहे. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Supply: हॉटेलचे जेवण महागणार! व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांना झटका

तुमचे Google अकाउंट कोणत्या Unknown डिव्हाइसवर लॉगिन आहे? तपासून लगेच करा डिलीट..पाहा स्टेप-बाय-स्टेप गाइड

T20 WC, IND vs NZ: फायनलमध्ये अहमदाबादची खेळपट्टी कोणाला मदत करणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

UPSC success story : यूट्युबवर ऑनलाईन व्हिडिओ पाहून कोल्हापूरच्या आरुषा पाटीलने युपीएसीमध्ये मिळवलं यश, तुम्हीही म्हणालं...

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT