Khed Shivapur toll naka Sakal
पुणे

Toll : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहनांना टोलमाफी हवी; नागरिकांची मागणी

भोर फाट्यापर्यंत जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहनांकडून खेड शिवापूर येथे टोल न घेता मोफत जाऊ द्यावे.

प्रशांत पाटील

सिंहगड रस्ता - भोर फाट्यापर्यंत जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहनांकडून खेड शिवापूर येथे टोल न घेता मोफत जाऊ द्यावे. २५ किलोमीटरसाठी ८० किलोमीटरचा टोल आकारू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खेड शिवापूर टोलनाका भोर हद्दीच्या पुढे होणे आवश्यक आहे. येथे एम. एच. १२, एम. एच. १४ परवाना असलेल्या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

सवलत न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेनकर यांच्यासह टोलनाका हटाव कृती समितीचे माऊली दारवटकर, ‘आप’चे पुणे शहर युवक अध्यक्ष अमित मस्के, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, सचिव प्रभाकर कोंढाळकर, शंकर थोरात, प्रशांत कांबळे आदींनी दिला.

दरम्यान, टोल माफ करण्याबाबत कोणतेही निर्देश अथवा सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. २० किलोमीटरच्या परिघात ३३० रुपयांत स्थानिक पास देण्यात येतो. येथील नागरिकांनी मासिक पास काढून घ्यावेत, असे आवाहन पुणे टोल रोड प्रा. लि.चे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT