पुणे

तक्रारी परस्पर बंद करण्यावर चाप

CD

पुणे, ता. २५ : पाणी, रस्ते, खड्डे, कचरा यासह विविध प्रश्‍नांसंबंधीच्या तक्रारी पुणेकरांकडून ‘पीएमसी केअर’द्वारे केल्या जातात. मात्र संबंधित तक्रारींची सोडवणूक झालेली नसतानाही या तक्रारी परस्पर बंद करण्याचा प्रकार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केला जातो. या प्रकारास आता चाप बसणार आहे. ‘पीएमसी केअर’वर आलेल्या तक्रारींची सोडवणूक होऊन त्याबाबत तक्रारदाराचा अभिप्राय प्राप्त होत नाही, तोपर्यंत संबंधित तक्रारी बंद होणार नाहीत, अशी भूमिका स्थायी समितीने घेत प्रशासनाला आदेश दिले आहेत.
रस्त्यांवरील खड्डे, दूषित पाणीपुरवठा, ठिकठिकाणी साठणारा कचरा, अस्वच्छता, पथदिव्यांचा अभाव या प्रश्‍नांसह नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्‍नांबाबत सजग नागरिकांकडून आवाज उठविला जातो. महापालिकेच्या संकेतस्थळासह ‘पीएमसी केअर’वर नागरिकांकडून दररोज मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या जातात. मात्र संबंधित विभाग व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तक्रारींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता त्या निकाली काढल्या जात असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. या गंभीर प्रकाराची स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दखल घेत स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत मुद्दा उपस्थित केला.

अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदार
याशिवाय विभागनिहाय तक्रार निवारणासाठी निश्‍चित कालमर्यादा ठरविणे, तृतीय पक्षामार्फत तक्रार निवारण व्यवस्थेचे ऑडिट करणे, दरमहा स्थायी समितीसमोर सविस्तर अहवाल सादर करणे आणि चुकीच्या पद्धतीने तक्रारी निकाली काढणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

महापालिकेस पीएमसी केअर, संकेतस्थळासह समाजमाध्यमांद्वारे अनेक तक्रारी प्राप्त होतात. या तक्रारी परस्पर बंद केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी एकात्मिक प्रणाली विकसित करत आहे. त्याचबरोबर तक्रार निवारण डॅशबोर्ड अद्ययावत केला जात असून पीएमसी केअर सॉफ्टवेअर अद्ययावत केले जात आहे. यापुढे नागरिकांच्या अभिप्रायाशिवाय तक्रारी बंद होणार नाहीत.
- श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT