pmp bus sakal
पुणे

Pune PMP : पीएमपीचे ३६ कर्मचारी निलंबित; तिघे बडतर्फ, १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र

‘पीएमपी’ सेवा परिणामकारक व्हावी म्हणून कर्मचाऱ्यांना आगार दत्तक देऊनही पालथ्या घड्यावर पाणी.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘पीएमपी’ सेवा परिणामकारक व्हावी म्हणून कर्मचाऱ्यांना आगार दत्तक देऊनही पालथ्या घड्यावर पाणी अशी स्थिती कायम राहिल्यामुळे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी बडगा उगारला.

कामावर सतत गैरहजर राहणारे ३६ कर्मचारी निलंबित करण्यात आले, तर आणखी बेशिस्त अशा तिघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. याशिवाय १५ आगारांतील १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले. या कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आला.

कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीत सुधारणा व्हावी, त्यांना शिस्त लागावी म्हणून सिंह यांनी विभागप्रमुख व सुपरव्हायझर दर्जाच्या अधिकाऱ्यांना आगारे दत्तक दिली. अधिकाऱ्यांनी आगारांची पाहणी केली तेव्हा अनेक कर्मचारी सतत गैरहजर असल्याचे, तसेच इतर अनेक कामात कसूर करताना आढळले. ही बाब गंभीर असल्याने त्यांना कारवाई करणे भाग पडले. या कारवाईमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सिंह यांनी विविध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, बस रद्द होण्याचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने त्यांनी उपाययोजना करण्यास सुरवात केली. दर शनिवारी पहाटे पाच वाजता नेमून दिलेल्या आगारात जाऊन कामाची पाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. मागील दोन्ही शनिवारी अशी पाहणी केली. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरु आहे याची माहिती मिळाल्यानंतर सिंह यांनी कडक कारवाईस सुरुवात केली.

अध्यक्षांची दक्ष कार्यपद्धती

पीएमपी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सचिंद्र प्रताप सिंह यांनी अनेक वेळा स्वतः बसमधून प्रवास करतात. अपेक्षित बदलांबाबत ते प्रवाशांशी चर्चा करतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत पीएमपीच्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढही झाली. मात्र कर्मचाऱ्यांअभावी बसच्या फेऱ्या रद्द करणे भाग पडत असल्यामुळे अध्यक्षांवर थेट कारवाईची वेळ आली.

अशी झाली कारवाई

कारवाई वाहक चालक

निलंबित ३० ६

बडतर्फ २ -

आरोपपत्र ७८ ६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT