बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवासी उन्हात उभे असतात sakal
पुणे

पुणे : PMP अधिकारी थंडगार, प्रवासी घामाघूम

शेड नसल्याने प्रवासी कडाक्याच्या उन्हात

सकाळ वृत्तसेवा

उंड्री: उन्हाचा कडाका वाढला आहे, अंगाची लाही लाही होत आहे. शाळा-महाविद्यालातील विद्यार्थ्यांबरोबर कामगारवर्ग बसथांब्यावर शेड नसल्याने उन्हाच्या कडाक्यात उभा राहून बसची प्रतिक्षा करीत आहे, तर अधिकारी मात्र थंडगार चेंबरमध्ये बसत असल्याची तीव्र संतापजनक भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

हडपसरमधील मंत्री मार्केटसमोरील महंदवाडी, उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, हांडेवाडीकडे, तर मार्केटच्या समोर शहराकडे जाणाऱ्या बसचायेथील बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवासी उन्हात उभे असतात. पीएमपी प्रशासनाचे अधिकारी या मार्गावरून जातात. मात्र, महागड्या थंडगार गाड्यांमधून उन्हात तिष्ठत उभे राहिलेले, शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग दिसत नसतील, अशी खोचक टिपण्णी धनंजय हांडे, संतोष गोरड, खंडेराव जगताप, विश्वास कदम या प्रवाशांनी दिली.

दरम्यान, बसथांब्यावर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पालिका प्रशासनाने शेड उभारावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे महेंद्र बनकर यांनी दिले आहे.बसथांब्यावर शेड नसल्याने उन्हात थांबायचे, बस वेळेवर येत नाही, बसमध्ये खच्चून गर्दी असल्याने बसायला जागा मिळत नाही. सुट्या पैशांसाठी वाहक अंगावर खेकसतात. प्रशासनाने बसथांब्यावर उन्हाथ थांबून, बसमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट दर तरी कमी केला पाहिजे.

-अनिल खळदकर, हांडेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT