PMPML BUS sakal
पुणे

PMPML BUS : पीएमपी बस ४७२; फेऱ्या १० हजार

कोरेगाव भीमासाठी २९ तास सेवा; सहा लाख प्रवाशांची वाहतूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पीएमपीची बस सेवा देण्यात आली. पीएमपीने ३१ डिसेंबर संध्याकाळी सहा वाजल्यापासून बससेवा सुरू केली, ती एक जानेवारीच्या रात्री ११ वाजेपर्यंत सुरूच होती. पीएमपीने अव्याहतपणे २९ तास सेवा दिली. २९ तासांत ४७२ बसच्या सुमारे १० हजार फेऱ्या झाल्या. सहा लाख प्रवाशांची वाहतूक झाली, तर पीएमपीला जिल्हा प्रशासनाने या सेवेसाठी ६२ लाख रुपये दिले.

पीएमपी प्रशासनाने लोणीकंद कुस्ती मैदान, वढू फाटा ते वढू व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते कोरेगाव भीमा या मार्गावर तसेच लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोल नाका या दरम्यान विनातिकीट सेवा दिली. दुपारनंतर नागरिकांच्या गर्दी वाढत गेली. त्यामुळे पीएमपी ने पिंपरी-चिंचवडहून जादाच्या २२ बस आणण्यात आल्या. ४७२ बसच्या माध्यमातून सहा लाख प्रवाशांची वाहतूक झाली.

पीएमपीला ५३ लाख मिळणे बाकी जानेवारी २०१९ व जानेवारी २०२० या दोन वर्षी पीएमपीने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासी सेवा दिली. त्या बदल्यात जिल्हा प्रशासन पीएमपीचे सुमारे ५३ लाख रुपये देणे लागते. ही रक्कम अद्याप पीएमपी प्रशासनाला मिळालेली नाही. आर्थिक तोट्यात असलेल्या पीएमपीला ही रक्कम मिळणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे.

नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सतत २९ तास सेवा दिली. यातून सहा लाख प्रवाशांची वाहतूक झाली. ६२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

  • पीएमपीची ‘धाव’

  • विनातिकीट बस : ३८२

  • तिकीट असलेल्या बस : ९०

  • एकूण फेऱ्या : १० हजार

  • एकूण कर्मचारी : ८५०

  • अधिकारी : २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT