पुणे

चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

CD

पुणे, ता. ३ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख सदनिकाधारकांना महिनाभरात घरगुती पाइप नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे. सोसायट्यांमध्ये ‘पीएनजी’चे जाळे उपलब्ध असूनही ‘एलपीजी’ सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी एक ऑक्टोबरपूर्वी ‘पीएनजी’ जोडणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केले आहे.

आखाती युद्धानंतर ‘एलपीजी’चा पुरवठा विस्कळित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाबाबतच्या आदेशांसह अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ‘एलपीजी’ नियंत्रण आदेश अधिसूचित केला आहे. त्यानुसार पीएनजीची सुविधा उपलब्ध असलेल्या घरांनी त्याचा वापर करणे अपेक्षित आहे.

‘एमएनजीएल’च्या माहितीनुसार, पुणे परिसरात सुमारे नऊ लाख घरांपर्यंत पीएनजीचे जाळे पोहोचले असून, पाच लाख घरांमध्ये त्याचा वापर सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरातील सुमारे साडेसहा हजार सोसायट्यांमध्ये ‘पीएनजी’ सुविधा उपलब्ध आहे. मात्र, जवळपास चार लाख सदनिकांनी अद्याप जोडणी कार्यान्वित केलेली नाही. यातील काही सदनिका बंद आहेत, काही भाडेतत्त्वावर आहेत, तर काही ठिकाणी ‘एलपीजी’चा वापर सुरू आहे. ‘एमएनजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक गिरिजा शंकर, वाणिज्यिक संचालक मेजर शंकर करजगी आणि संचालक बागेश्री मंठाळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

३७१ सोसायट्या ‘एलपीजी’मुक्त
नवीन जोडणी संदर्भात ‘एमएनजीएल’ने सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या पाच महिन्यांत ३७१ सोसायट्या ‘एलपीजी’ सिलिंडरमुक्त झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी ८०० सोसायट्या ‘एलपीजी’मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT