पुणे

Pune Police : अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला २५० CCTV तपासून ठोकल्या बेड्या

पुणे महापालिका परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.

अक्षय बडवे

पुणे महापालिका परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर चालक ट्रकसह पसार झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी एक दोन नव्हे तर, तब्बल २५० सीसीटिव्ही फुटेज तपासून चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, २२ जानेवारी रोजी दिवसांपूर्वी पुणे महापालिका परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत पृथ्वीराज विष्णुकुमार शेळके (वय २२ ) या तरूणाचा मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर ट्रक चालक ख्वाजामिया मस्तानमिया खानने घटनास्थळावरून पळ काढला होता. यामुळे पोलिसांना ट्रकचा नंबर मिळू शकला नव्हता.

दरम्यान,पोलिसांनी या घटनेची दखल घेत महापालिका भवन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता खान गाडगीळ पुतळा परिसरातून कुंभार वाडा चौकातून मालधक्का परिसरात गेल्याचे दिसले.

पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचला असता खान हैद्राबादला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काल मंगळवारी परत मालधक्का चौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून ख्वाजामिया मस्तानमिया खानला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

SCROLL FOR NEXT