पुणे

कोरोनाबाबत पुणे पोलिस हुशार; बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष 

पांडुरंग सरोदे

पुणे - बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णलयाच्या बालरोग चिकित्साशास्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 98.5 टक्के पोलिसांना कोरोनाबाबत चांगले ज्ञान असल्याचे समोर आले आहे. परंतु. अनेक नागरिक लॉकडाउनच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांवरील ताण वाढत असल्याचे निरीक्षण 42 टक्के पोलिसांनी नोंदविले आहे. कोरोनामुळे 124 पोलिस अधिकारी व कर्मचारी कुटुंबापासून दूर राहात असल्याची बाबही यातून पुढे आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 8 हजार 651 पैकी 5 हजार 692 (66 टक्के) पोलिसांनी सहभाग घेतला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाच्या विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ.आरती किणीकर, सहायक प्राध्यापक डॉ.नरेश सोनकवडे आणि त्यांच्या 7 ते 8 जणांच्या पथकाने "कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांचे ज्ञान, दृष्टिकोन व सेवा हा विषय घेऊन अभ्यासात्मक सर्वेक्षण केले. 

सर्वेक्षणातून समोर आलेल्या बाबी 
- नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे 2 हजार 344 (42 टक्के) पोलिसांचे मत 
- नागरीकांनी शिवीगाळ करीत हल्ला केल्याची 24 पोलिसांची (5 टक्के) माहिती 
- नागरिकांकडूनही पाच पोलिसांविरुद्ध तक्रार 
- स्वयंसेवी संस्थांकडूनही सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन 
- कोरोनाबाबत 98.5 टक्के पोलिसांना चांगले ज्ञान 
- प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुविधांबाबत 95 टक्के पोलिस समाधानी 
- कुटुंबीयांनी संर्सग होऊ नये यासाठी 96 टक्के पोलिसांकडून काळजी 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाचा पोलिसांना बसणारा फटका 
- वाहतूक सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याचे 432 (8 टक्के) पोलिसांचे मत 
- कोरोनामुळे 297 (5 टक्के) पोलिसांना चहा, नाश्‍ता व जेवण नाही 
- स्वच्छतागृहांचा अभाव असल्यामुळे महिला पोलिसांची गैरसोय 
- दैनंदिन किराणा किंवा अन्य वस्तू आणण्यास 365 कर्मचाऱ्यांना अडचण 
- दवाखाने, खासगी रूग्णालये खुले नसल्याचा 104 जणांना फटका बसला 
- वाहने दुरूस्त करण्याची 70 पोलिसांना समस्या 
- पगार कमी आल्याने 35 पोलिसांना अडचण 

या सर्वेक्षणात 98.5 टक्के पोलिस कोरोनाबाबत जागरुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः व कुटुंबाला कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी 96 टक्के पोलिसांकडून काळजी घेतली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
- डॉ.के.वेंकटेशम, पोलिस आयुक्‍त, पुणे 

नागरिकांकडून लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने पोलिसांवरील ताण वाढत आहे. महिला पोलिस कुटुंबाबात अधिक काळजी करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. काही पोलिसांनी त्यांच्या अडचणी मांडल्या असून, पोलिस आयुक्तांनी याची दखल घेतली आहे. 
- डॉ. आरती किणीकर, प्राध्यापक व विभागप्रमुख ,बालरोग चिकित्साशास्र विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT