gold crime sakal media
पुणे

पुणे : सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेकडुन अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खुनाचा प्रयत्न करण्याबरोबरच विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. आरोपी 10 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता.जयेश कृष्णा वाघ (वय 31, रा. माय फेयर रेसिडेन्सी, दिवान वाडी, वसई, पालघर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वाघ पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून तो निलेश घायवळ टोळीचा सदस्य आहे. त्याने 10 महिन्यापूर्वी कोथरुड परिसरात एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून तो फरारी होता. तो राहण्याची ठिकाणे सातत्याने बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, संबंधित आरोपी हा वसई येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची खबर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे व नितीन रावळ यांना मिळाली.

सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा, पोलिस कर्मचारी नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे,नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण यांच्या पथकाने वसई येथे जाऊन आरोपीस अटक केली. आरोपीला पुढील तपासाठी कोथरूड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT