MPSC student 
पुणे

पुणे : MPSC च्या विद्यार्थांसोबत ठिय्या मांडलेल्या पडळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

पुणे : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या MPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शाससाने घेतल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटले. पुण्यासह काही प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. पुण्यात झालेल्या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. दुपारपासून पुण्यातील नवी पेठेत रस्त्यावर ठिय्या मारलेल्या पडळकरांना पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. 

पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, वाशिम, परभणी, अमरावती आदी शहरांमध्ये विद्यार्थी एमपीएससी परीक्षा रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, पुण्यात झालेल्या आंदोलनात भाजप नेते गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांसह विविध भाजपच्या नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाला ट्विटद्वारे विरोध दर्शवला. यामध्ये सरकारमधील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, युवा काँग्रेसचे प्रमुख सत्यजीत तांबे यांसारख्या युवा नेत्यांनीही सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही असं त्यांनी म्हटलं.

विद्यार्थ्यांची दडपशाही सुरु - पडळकर

दरम्यान, सरकारकडून विद्यार्थ्यांची दडपशाही सुरु असून जोपर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिलं असा इशारा या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला होता. 

आठ दिवसांत परीक्षा होईल - मुख्यमंत्री

राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर आणि सर्वपक्षीय नेत्यांनी याला विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियावरुन व्हिडिओद्वारे संवाद साधत येत्या आठ दिवसांत MPSCची परीक्षा घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. तसेच उद्याच याची तारीखही घोषीत करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil and Devendra Fadnavis : शरद पवारांचे खासदार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला जाण्यापूर्वी जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास; राजकीय चर्चांना उधाण

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

SCROLL FOR NEXT