Amitesh Kumar eSakal
पुणे

Pune Porsche Accident: 'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'; पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

police commissioner Amitesh Kumar pc: कल्याणी नगरमधील अपघाताप्रकरणी पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे

कार्तिक पुजारी

पुणे- कल्याणी नगरमधील अपघाताप्रकरणी पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. सदर प्रकरणामध्ये पोलीस सुरुवातीपासूनच बारकाईने काम करत आहेत. आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत. त्यामुळे दबाव किंवा दिरंगाई झाली असं म्हणणं योग्य नाही, असं अमितेश कुमार म्हणाले.

आरोपीचे अद्याप ब्लड रिपोर्ट मिळालेले नाहीत. आरोपीला काही विशेष सुविधा देण्यात आली किंवा काही खाद्यपदार्थ देण्यात आले याबाबत पुरावे मिळालेले नाहीत. तरी आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत. कलम ३०४ लावण्यास उशीर का झाला याची चौकशी सुरु आहे. पण, कोणाचा आमच्यावर दबाब आहे असं म्हणणं योग्य नाही, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

जे आरोप होत आहेत, त्याप्रकारचे काही आमच्या चौकशीमध्ये आढळलेलं नाही. दारुमुळे आरोपीला काही कळतच नव्हतं अशी परिस्थिती नव्हती. आरोपी पूर्ण शुद्धीत होता हा आमचा युक्तीवाद आहे. सकाळी नऊ वाजता आरोपीचे पहिली ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. आम्ही सर्व सीसीटीव्ही मिळवले आहेत. तपास सुरु आहे. सर्व गोष्टी सांगणं उचित नाही, असं ते म्हणाले.

काही काळाने ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला हे सत्य आहे. ड्रायव्हरने सुरुवातीला म्हटलं होतं की त्यानेच गाडी चालवली होती. त्याने कोणाच्या दबाबामुळे हे म्हटलं याचा देखील तपास सुरु आहे. घटनेचा सर्व क्रम आम्हाला कळाला आहे. आमदार सुनिल टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये आले होते हे सत्य आहे, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. सुरुवातीला थोडी दिरंगाई झाली हे सत्य आहे. घटनाक्रम कळताच कलम ३०४ लावण्यात आले आहे. त्या रात्रीचे सर्व सीसीटीव्ही आमच्याकडे आहेत. गुन्हे शाखेकडून युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. पार्टीमध्ये १० ते १२ जण होते. अपघातावेळी कारमध्ये चारजण होते. काही निष्काळजीपणा आणि दोष येरवाड्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होईल, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT