आत्महत्या  
पुणे

रक्ताने ‘सॉरी मॉम’ लिहून पुणे पोलिसाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला तरुण पोलिस शिपाई रज्जाक महंमद मणेरी (वय २४, मूळगाव बावडा, ता. इंदापूर) यांनी सध्या राहत असलेल्या किकवी (ता. भोर) येथील त्यांच्या घरामध्ये आत्महत्या केली.

याबाबत रज्जाक यांचे वडील व निवृत्त पोलिस कर्मचारी महंमद मणेरी यांनी राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. रज्जाक हे गेल्या सहा महिन्यांपासून राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सोमवार (ता. २१) रात्रीपासून ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील व नातेवाईक किकवी येथे आले. त्यावेळी रज्जाक यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी खिडकीतून काठीच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता रज्जाक हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी हाताची नस कापून घेऊन नंतर गळफास घेतल्याचे दिसले. मात्र, गळफास तुटून ते जमिनीवर पडले होते. घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहीले होते.

दरम्यान, ही घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह राजगड पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सहकाऱ्यांना या घटनेचा मोठ्ठा धक्का बसला. कामात अत्यंत हुशार व तडफदार असलेल्या रज्जाक यांनी असे काही केले आहे, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT