पुणे

तडीपार गुन्हेगारांचा शहर परिसरात वावर

CD

पुणे, ता. ६ : शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतरही शहरात उघडपणे वावरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाघोली परिसरात हातात कोयते हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्यासह खराडीत फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सराइतांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, काही तडीपार गुन्हेगार शहरात बेकायदा वास्तव्य करत पुन्हा गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. वाघोलीतील आव्हाळवाडी रस्त्यावर तडीपार गुन्हेगार आणि त्याच्या साक्षीदारांनी हातात कोयते हवेत फिरवून स्थानिक दुकानदार आणि पादचाऱ्यांना धमकावत दहशत निर्माण केली. वाघोली पोलिसांनी कारवाई करत ओम दादाराव म्हस्के, अथर्व दत्तात्रेय येवले (दोघेही रा. वाघोली) आणि विठ्ठल साहेबराव रूपनर (रा. खरोसा, जि. लातूर) या तिघांना अटक केली.

दुसऱ्या घटनेत, साहिल सादिक शेख (वय २१, रा. इंदिरानगर, लोहगाव) या सराईत गुन्हेगाराला डिसेंबर २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तरीही तो खराडी परिसरातील एका आयटी पार्कजवळ मोकळ्या मैदानात आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ सातच्या पोलिस उपायुक्तांनी त्याच्याविरुद्ध तडीपारीचा आदेश दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मुंबईत इमारतीच्या २३व्या मजल्यावर भीषण आग! दिवाळीच्या रॉकेटने आग लागल्याचा संशय

AI Safety: एआयला अधिकार देण्याची घाई करू नका; अन्यथा मोठे संकट अटळ! कोणी दिला धोक्याचा इशारा?

YouTube Tutorials Fake Currency Racket : यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून छापल्या चक्क ६.७८ कोटींच्या बनावट नोटा! नंतर स्वतःच 'पोलीस' बनून लोकांना लुटलं; धक्कादायक प्रकार उघडकीस

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT