CBI
CBI 
पुणे

BHR प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा CIDशी पत्रव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) यापूर्वीच भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार संबंधीचे प्रकरण हाताळले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडे असलेल्या "बीएचआर'च्या सध्याच्या गुन्ह्याच्या तपासासाठी "सीआयडी'कडे असणारी ठेवीदारांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना पत्र पाठविले आहे. ठेवीदारांची माहिती मिळाल्यास या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. 

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारासंबंधी "सीआयडी'ने त्यांच्याकडे दाखल असलेल्या 73 गुन्ह्यांचा तपास करून त्याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेले आहे. "सीआयडी'ने मोठ्या प्रमाणात तपास करून "बीएचआर'मधील गैरव्यवहार पुढे आणला होता. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सध्या "बीएचआर' पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथे एकाचवेळी छापे घालून ट्रकभर पुरावे जप्त करून सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांकला (वय 40), महावीर माणिकचंद जैन (वय 37), ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (वय 45), सुजित सुभाष बाविस्कर (वय 42) आणि कमलाकर भिकाजी कोळी (वय 28, सर्व रा. जळगाव) पाच जणांना अटक केली होती. आरोपींकडून सध्या अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहे. तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर यांना अद्याप अटक झालेली नाही. 

दरम्यान, या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास केला जात आहे. या तपासाला गती मिळावी, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून "सीआयडी'कडे असणारी ठेवीदारांची माहिती मिळण्यासाठी पत्र पाठविलेले आहे. "सीआयडी'कडून मिळणाऱ्या माहितीमुळे ठेवीदारांची एकूण संख्या, त्यांची किती रक्कम आहे, किती ठेवी थकीत आहेत आणि अन्य स्वरूपाची माहिती मिळणार आहे. त्याचा उपयोग आर्थिक गुन्हे शाखेला होणार आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुचेता खोकले, पोलिस निरीक्षक संदीप भोसले, माधव करंदीकर, वैजनाथ शिंदे, रौफ इनामदार, सोनाली गायकवाड, सपना म्यॅना यांचे पथक करीत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT