Crime News esakal
पुणे

Pune Crime: पुण्यातील सिंहगड रोडवर डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

सकाळी सिंहगड रस्त्यावरील सिल्वर बर्च हॉस्पिटल च्या समोर कालव्यालगत असलेल्या झुडपामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.

निलेश बोरुडे

Pune Crime - किरकटवाडी सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्या जवळील गोसावी वस्ती समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह कालव्याजवळील झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल चंद्रकांत आटोळे ( वय 36 रा. गोसावी वस्ती नांदेड ता. हवेली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हत्तेचे कारण अस्पष्ट आहे.

आज सकाळी सिंहगड रस्त्यावरील सिल्वर बर्च हॉस्पिटल च्या समोर कालव्यालगत असलेल्या झुडपामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. याबाबत हवेली पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे , पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस हवालदार अशोक तारू, पोलीस नाईक संतोष भापकर, राजेंद्र मुंडे, प्रवीण ताकवणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हत्या झालेल्या राहुल आटोळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आहेत. राहुलचा पेरू विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. त्याची हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT