ajit pawar esakal
पुणे

Pune Police : अजित पवारांनी उपटले पुणे पोलिसांचे कान

'एखादा गुन्हेगार सापडत नसेल तरच बक्षीस जाहीर केले जाते, त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. यामुळे पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

सकाळ वृत्तसेवा

'एखादा गुन्हेगार सापडत नसेल तरच बक्षीस जाहीर केले जाते, त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. यामुळे पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

पुणे - 'एखादा गुन्हेगार सापडत नसेल तरच बक्षीस जाहीर केले जाते, त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. यामुळे पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ही योजना ज्याने जाहीर केली त्या पोलिस अधिकार्याकडे विचारणा करणार आहे, अशा शब्दात पुणे पोलिसांच्या त्या निर्णयावर अजित पवारांची टीका करत अधिकार्यांचे कान उपटले.

गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला होता. फरार असणाऱ्या, पाहिजे असणाऱ्या, शस्त्र बाळगणाऱ्या आणि सराईत गुंडांना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच ते दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. या निर्णयावर अजित पवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबातच सापडत नसेल तेव्हा त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं जातं. मात्र सरसकट बक्षीस जाहीर होत असेल तर पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कायदा सुव्यवस्था राखणे आणि महिलांवर अत्याचार न होऊ देणे हे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मात्र या कामासाठी त्यांना आमिष दाखवलं जात असेल तर हे योग्य नाही.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून, खबऱ्याच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. नवीन पांडे पाडण्याची गरज नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बक्षीस देण्याचा निर्णय का घेतला त्याची मी त्यांना विचारणा करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT