Pune Police sakal
पुणे

Pune Police : हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करणार; पदभार स्विकारताच आयपीएस अनमोल मित्तल 'ॲक्शन मोडवर'

हवेली पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच अनमोल मित्तल हे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी हद्दीतील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली पडताळण्यास सुरुवात केली आहे.

निलेश बोरुडे

Pune Police - हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून अवघे पंचवीस वर्षे वय असलेले तरुण प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवेली पोलीस ठाण्याचे तात्पुरते प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याकडून अनमोल मित्तल यांनी पदभार स्वीकारला.

सचिन वांगडे यांची पुन्हा पुणे ग्रामीण मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हे आदेश जारी केले आहेत. हवेली पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच अनमोल मित्तल हे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी हद्दीतील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली पडताळण्यास सुरुवात केली आहे.

गुन्हेगारी टोळ्यांतील सदस्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल अशाप्रकारे पोलीस ठाण्याचा कारभार चालविण्यावर भर देण्यात येणार असून पुढील काळात पर्यटन स्थळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही काळात वाढलेली अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, समाजकंटकांकडून होणारी महिलांची छेडछाड, गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्ववादामुळे घडणारे गंभीर गुन्हे हे रोखण्यासाठी अत्यंत तरुण असलेले आयपीएस अनमोल मित्तल किती प्रभावी उपाययोजना करतात या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल.

सद्यस्थितीत मात्र आयपीएस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Poisoning: महाप्रसादातून विषबाधा, गर्भवतीने बाळाला जन्म दिला पण दीड दिवसातच चिमुकल्याचा मृत्यू

IND vs NZ 3rd T20I: भुवनेश्वर कुमार, वैभव सूर्यवंशी OUT; इशान किशन IN! तिसऱ्या सामन्यासाठी Playing XI मध्ये होणार बदल

Ichalkaranji Crime : पहाटे भांडले, पत्नीने झोपेच सोंग घेत पतीचा काटा काढला अन्; झोपून सकाळी मुलीसोबत पोलिस स्टेशन गाठलं, इचलकरंजीत धक्कादायक घटना

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

Nagpur Weather: पूर्व विदर्भात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT