Pune Police  sakal
पुणे

Pune Police : दत्तवाडी पोलिस ठाणे आता पर्वती पोलिस ठाणे म्हणून ओळखले जाणार

याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Pune Police - शहरातील दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नामकरण आता पर्वती पोलिस ठाणे असे करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलिस चौकी आणि दत्तवाडी पोलिस ठाणे यांच्या नावातील साधर्म्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील दत्तवाडी पोलिस ठाणे हे स्वारगेट पोलिस ठाण्यापासून २००७ साली वेगळे झाले होते. दत्तवाडी पोलिस ठाणे आणि दत्तवाडी चौकी यामधील नामसाधर्म्यामुळे नागरिकांना संभ्रम होत होता.

याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांच्या अडचणींची दखल घेत पोलिस महासंचालक कार्यालयाने दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलिस ठाणे करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. या परिसरातील पर्वती टेकडीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विचारात घेवून नामकरण करण्याच्या निर्णय घेतला आहे, असे राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT