Pune police did route march with 200 officers and police deputy commissioner in Katraj 
पुणे

Corona Virus : कात्रजमध्ये पुणे पोलिसांचे पथसंचलन; पोलिस उपायुक्तांसह २०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये याबाबत आवाहन करण्यासाठी बुधवारी दुपारी साडेचार वाजता कात्रज परिसरामध्ये पुणे पोलिसांनी पथसंचलन केले. पोलिसांनी मास्क लावून, सामाजिक अंतर ठेवून परिसरामध्ये संचालन केले.  "कोरोनाची व्याप्ती गांभीर्याने लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच जीवनावश्यक वस्तू आठ ते दहा दिवसांच्या घेऊन ठेवाव्यात सतत रस्त्यावर येऊ नये." असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी यावेळी केले.

भारती विद्यापीठ पोलिस न ठाण्याच्या हद्दीतील कात्रज परिसरामध्ये पुणे पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पोलिसांचे जरब रहावी नागरिकांनी घराबाहेर पडू नये या उद्देशाने या पथसंचलनाचे आयोजन केले होते.
यावेळी पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेत नागरिकांना आवाहन केले. 

डॉ.के.वेंकटेशम व डॉ.रवींद्र शिसवे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून संचलन करणाऱ्या पोलीस अधिकारी व व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये पोलिसांच्या कामाबाबत गांभीर्य राहावे, यादृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी या संचलनाचे नेतृत्व केले. संचलनामध्ये सहाय्यक पोलिस  आयुक्त महा सर्जेराव बाबर, पोलिस निरीक्षक वसंत कुंवर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे यांच्यासह २०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. भारती विद्यापीठ, कात्रज, दत्तनगर या परिसरामध्ये संचलन करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले.


"शहरात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तू एकदाच खरेदी करून ठेवाव्यात.परिस्थितीचे गांभीर्याने लक्षात घेऊन सतत रस्त्यावर येऊ नये. घरात राहून स्वतची काळजी घ्यावी. पुणे पोलिसांनी आपले कर्तव्य निभावताना ही "सोशल पोलिसिंग"ला प्राधान्य दिले.भरोसा सेलच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांना औषधे, खाद्यपदार्थ व अन्नधान्य दिले. तसेच स्थलांतरित नागरीक, बेघर, गोरगरीब, देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांना निवास, भोजन, अन्नधान्य देत सामाजिक बांधिलकी जोपासली."
- ​डॉ.के.वेंकटेशम, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT