Corona_Curfew 
पुणे

महत्त्वाची बातमी : पुणेकरांनो, घाबरून जाऊ नका; संचारबंदीबाबत पोलिस प्रशासनाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणुचा नवा प्रकार आढळून आल्याने सतर्कता म्हणून राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये रात्रीची संचार बंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेतच संचारबंदी असणार आहे. तर रात्री अकरापर्यंत पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. 

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूंचा प्रकार आढळला असून तो अधिक धोकादायक असल्यामुळे ब्रिटन पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही सतर्कता म्हणून ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून (ता.22) ते 5 जानेवारीपर्यंत राज्य सरकारचा आदेश लागू असणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील महापालिकांना सतर्कतेच्यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. 

संचारबंदी आदेश हा फक्त रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेपुरता असणार आहे. सकाळी सहा ते रात्री 11 या वेळेमध्ये शहरांमधील जनजीवन पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

पहिला लॉकडाऊन 23 ते 31 मार्च 2020 
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात पहिल्यांदा 23 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.23 ते 31 मार्च या कालावधीपर्यंत पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर जुलैपासून लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथील करण्यात आले. त्याचबरोबर उद्योग, व्यावसाय सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. 

''शासनाच्या आदेशाच्या प्रतीची आम्ही वाट पाहत आहोत. शासनाकडून देण्यात येणाऱ्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. नागरीकांनी देखील प्रशासनाचा अधिकृत आदेश प्रमाण मानावा. प्रशासनाची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोचवली जाईल. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये.''
- डॉ.रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षांचा वैभव फक्त 'ऑरेंज कॅप'च नव्हे, तर ४ मोठे पुरस्कार नावावर करणार... वाचा किती लाख कमावणार?

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

SCROLL FOR NEXT