DSK_Car 
पुणे

पुणे : डीएसकेंची आणखी एक आलिशान कार पोलिसांनी केली जप्त!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ठेवीदारांच्या फसवणुकीप्रकरणी कारागृहात असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी (डीएसके) यांच्या काही वाहनांचा 15 दिवसांपूर्वी लिलाव झाला होता. तसेच अजून काही गाड्यांचा लिलाव होणे बाकी असतांना आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंची विदेशी बनावटीची आणखी एक आलिशान कार मुंबईतून जप्त केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डीएसके, त्यांचे कुटुंबीय व कंपनीच्या नावे असणाऱ्या 46 वाहनांपैकी 19 चारचाकी वाहने व एक महागडी दुचाकी जप्त केली होती. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार, 15 फेब्रुवारीला डिएसकेंच्या सहा गाड्यांचा लिलाव करण्यात आला. लिलावामध्ये या सहा गाड्यांसाठी 39 लाख 45 हजार रुपये इतकी किंमत मिळाली होती.

दरम्यान, आरोपीच्या नावे विदेशी बनावटीची वाहने असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र संबंधीत गाड्या अद्याप पोलिसांना प्राप्त झाल्या नव्हत्या. या गाड्या पोलिसांना मिळाव्यात, यासाठी पोलिसांनी संबंधीत गाड्या या सर्व्हिसींग व अन्य कामांसाठी कामाकरीता अधिकृत सर्व्हिसींग सेंटरला येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन टोयाटोच्या सर्व सर्व्हिसींग सेंटरला, त्याबाबत माहिती कळविण्यास सांगितले होते.

त्याप्रमाणे लॅंड क्रुझर (एमएच 12 एमजे 9999) हे वाहन मुंबई येथील रे रोडवरील मधुबन टोयटा या सर्व्हिस सेंटरला आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांच्या पथकाने ताब्यात घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT