पुणे

तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल; आई-वडील मुकबधीर, 6 वर्षांची ईशा अडकली लॉकडाऊनमध्ये

सकाळवृत्तसेवा

पुणे : मूकबधिर दाम्पत्याची ६ वर्षांची ईशा गावाकडे आजीकडे गेली होती. इकडे लॉकडाऊन सुरू झाला आणि तिला माघारी परतणे अवघड झाले. लॉकडाऊनची मुदत वाढल्याने १४ एप्रिलनंतर आई-वडिलांकडे जाण्याची आशा मावळली तसा तिचा धीर सुटला, त्यांच्या भेटीसाठी ईशा व्याकूळ झाली. रात्रंदिवस रडू लागली. फोन, व्हिडिओ कॉल केल्यावरही मूकबधिर आई-वडिलांचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. ईशाची व्याकूळता 'ड्युटी'मुळे आपल्या मुलांपासून दूर असणाऱ्या पुणे पोलिसांच्या हृदयापर्यंत पोचल्या आणि पुढच्या काही तासातच ईशा तिच्या आई-वडिलांच्या कुशीत विसावली आणि निःशब्द भावनांची जागा आनंदाश्रूंनी घेतली !

सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांना त्यांच्या ओळखीचे अमित काळे यांचा फोन आला. त्यांनी त्यांच्या भाचीला पुण्याला तिच्या आई-वडिलांकडे पोचविण्यासाठी मदतीची मागणी केली. काळे यांची मूकबधिर बहीण आरती नातू व त्यांचे पती राहुल हे त्यांची मुलगी ईशा हिच्यासह पुण्यातील सदाशिव पेठेत राहतात.

ईशा एक महिन्यापूर्वी तिच्या आजीला भेटण्यासाठी सांगलीतील कासेगाव येथे गेली होती. त्याचवेळी लॉकडाऊन सुरु झाला, त्यामुळे तिच्या मामाला ईशाला पुण्याला घेऊन येणे अवघड झाले.14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन संपेल, त्यानंतर आपण पुण्याला जाऊ, अशा शब्दात सुरवातीला ईशाची समजूत काढण्यात आली. परंतु त्यानंतर तिने आई-वडिलांकडे जाण्यासाठी हट्ट धरला. ती रात्रंदिवस रडू लागली, ईशा आई-वडिलांना फोन, व्हिडिओ कॉल करीत होती, पण दोघेही मूकबधिर असल्याने त्यांच्या भावना तिच्यापर्यंत पोचू शकत नव्हत्या. त्यामुळे तर ईशा आणखीनच व्याकूळ होऊ लागली. 

दरम्यान, जाधव यांनी हा प्रकार पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेश यांना सांगितला. त्यांनी याबाबत पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांना मदत करण्यास सांगितले. "ड्युटी"मुळे आपल्या मुलांपासून दूर राहणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलिसाना ईशाची वेदना समजली. त्यानंतर चक्रे वेगाने फिरली. पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी मुलीला सोडण्यासाठी तिच्या मामाला पुण्याला येण्यासाठी व पुन्हा माघारी जाण्यासाठी परवानगी दिली.

केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी मुलीला व तिच्या मामाला प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास युनिट दोनचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांचा संपर्क क्रमांक दिला. त्यांना पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी सहकार्य केले. त्यानंतर ईशाला घेऊन तिचा मामा पुण्याला पोचला. अखेर एक महिन्याने ईशा तिच्या आई-वडिलांच्या कुशीत विसावली. त्यानंतर तिथे शब्दांची जागा आनंदाश्रूंनी घेतली. पुणे पोलिसांनी आई-वडील व मुलीच्या घडवून आणलेल्या या भेटीबद्दल नंदिनी जाधव व ईशाच्या आई वडिलांनी पत्र लिहून पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT