Pune Police sakal
पुणे

पुणे : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांचा पोलिसांकडून कसुन शोध सुरु

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या प्रकरणामध्ये सायबर फॉरेन्सीक तपासासाठी व्हिडीओ पुरावे पाठविण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या प्रकरणामध्ये सायबर फॉरेन्सीक तपासासाठी व्हिडीओ पुरावे पाठविण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केली आहे.

पुणे - पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या प्रकरणामध्ये सायबर फॉरेन्सीक तपासासाठी व्हिडीओ पुरावे पाठविण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. एकीकडे तांत्रिक तपास सुरु असतानाच दुसरीकडे, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या देशभरातील कार्यालयांवर शुक्रवारी (ता.23) रोजी छापे घालत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. "एनआयए'च्या या कारवाईच्या पार्श्‍वभुमीवर "पीएफआय'च्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली होती. दरम्यान, पोलिसांनी हे आंदोलन गुंडाळले. मात्र, संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात असतानाच, काही कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यासंबंधीचे व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. त्यापुर्वी, अशा घोषणा दिल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र या प्रकरणाचे राज्य व राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटल्यानंतर "पीएफआय'च्या 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर 41 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 141 अंतर्गत नोटीस बजावून सोडून दिले होते. त्यानंतर संबंधित आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल गुन्ह्यात देशद्रोहाशी संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ पोलिसांकडून गोळा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हे व्हिडीओ बंडगार्डन पोलिस ठाण्यात जमा करुन, तेथून ते सायबर फॉरेन्सीक लॅबमध्ये तांत्रिक तपासासाठी पाठविण्यात येत आहेत. तांत्रिक तपास पुर्ण झाल्यानंतरच देशविरोधी घोषणा कोणी दिल्या, त्याबाबतची नावे स्पष्ट होतील, त्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई केली जाणार आहे. सध्या तरी 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे, 41 जणांना ताब्यात घेऊन सोडले आहे. सध्या तांत्रिक तपास सुरु असून त्यासाठीचे व्हिडीओ फॉरेन्सीकसाठी पाठविले जात असल्याचे बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

'पीएफआय'च्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यामध्ये देशद्रोहासंबंधी कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आता देशविरोधी घोषणा दिल्याचा तांत्रिक तपास सुरु आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.'

- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Minor Girl Incident : नाशिक जिल्हा अश्लीलतेच्या चर्तेतून बाहेर जात नाही, खरातनंतर खासगी व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीबाबत उचललं चुकीचं पाऊल

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT