Pune Police  sakal
पुणे

Pune Police : चोरी गेलेला एक लाख ६० हजार, दागिने पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत करून ज्येष्ठ दांपत्यांना सुपूर्त

सदर गून्हातील फिर्यादी हे वयस्कर असल्याने व त्यांना कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत पाठपुरावा केला.

सुदाम बिडकर

Pune Police - धामणी ता. आंबेगाव येथे दि. १६ फेब्रुवारी रोजी गोविंद भगवंत जाधव (वय ८२ वर्ष) व नंदाबाई जाधव या ज्येष्ठ दांपत्याला चाकूचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळी जबरी चोरी करणात आली होती.

या वेळी चोरट्यांनी एक लाख ६० हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. त्यानंतर या गुन्ह्यातील चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती . पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केलेले दागिने व पैसे न्यायालयाच्या आदेशानुसार जेष्ठ जाधव दांपत्याला सुपूर्त केले आहे.

पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणी येथे दि. १६फेब्रुवारी २०२३ रोजी गोविंद भगवंत जाधव व नंदाबाई जाधव या ज्येष्ठ दांपत्याला हातपाय बांधून, चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन एक लाख ६० हजार रुपयांचे मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता.

सदर गून्हातील फिर्यादी हे वयस्कर असल्याने व त्यांना कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत पाठपुरावा केला.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व पारगाव पोलीस ठाणे यांनी गुन्ह्याचा तपास करत असताना सी सी टीव्ही फुटेज व गोपनीय खबऱ्याच्या मार्फत माहिती मिळवत यातील आरोपी रवींद्र भाऊसाहेब फड (वय ३१), आकाश पांडुरंग फड (वय २६), नंदकुमार रामा पवार (वय २१), वैभव दिगंबर नागरे (वय १९) सर्व रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले होते.

अटकेनंतर आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. त्या दरम्यान आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करुन न्यायालयाचे आदेशाने आज सोमवारी पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते ज्येष्ठ दांपत्यांना सुपूर्त करण्यात आला आहे. यावेळी पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : मेटाचा केजरीवालांना दणका, इन्स्टा अकाउंट केलं बंद; केजरीवाल म्हणाले, PM मोदींसमोर इतकं झुकू नका

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT