sucide case sakal
पुणे

Pune : कौटुंबिक वादातून आत्महत्या करणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण

भारती विद्यापीठ पोलिसांचे उल्लेखनिय काम; तरुणाचे मतपरिवर्तन करण्यात यश

सकाळ वृत्तसेवा

पुणे (कात्रज) : कौटुंबिक कलहातून राहत्या घरात ओढणीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण वाचविण्यात पोलिसांना यश आले. ही घटना गुरुवारी रात्री भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांना तरुणाचे मत परिवर्तन केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचे प्राण वाचवले.

बीट मार्शल ब्रह्मानंद केंद्रे व नानासाहेब खाडे हे गुरुवारी रात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी केंद्रे यांना बिनतारी संदेश यंत्रणेवर एक तरुण आत्महत्या करत असल्याचा संदेश मिळाला. घटनेची माहिती मिळताच केंद्रे आणि खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी आपल्याच घरात एक तरुण खुर्चीवर उभे राहून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत होता. केंद्रे यांनी तात्काळ तरुणाला खाली घेऊन त्याला समजावले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT