police 
पुणे

पुण्यात पोलिसांची 'सिंघम' कामगिरी; गुंडांना असा शिकविला धडा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडाकडून वाकड परिसरात दहशत निर्माण होत असल्याने चार गुंडांची (बुधवारी ता. 25) वाकड पोलिसांनी धिंड काढली.  

हा प्रकार वाकडच्या काळाखडक परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडून अनुभवला .
अरविंद गौरवसाठी (वय 20) सूरज पंडित पवार (वय 21), राहुल उर्फ बुग्या हिरामन लष्करे (वय 19) आणि विशाल शहाजी कसबे (वय 23 सर्व रा. काळा खडक, वाकड) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. यातील विशाल कसबे हा तडीपार गुंड आहे.

या प्रकाराबाबत वाकडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी गेल्या काही वर्षांपासून आरोपी परिसरात दहशत निर्माण करत होते. यामुळे आरोपी कसबेला पोलिसांनी तडीपार केले होते  तरी देखील तो आपल्या मूळ साथीदारांच्या मदतीने परिसरात येऊन दहशत निर्माण करीत होता.

दोनच दिवसांपूर्वी मल्लारी मोतीराम लोंढे यांनी गुन्हेगारांना दुकान भाड्याने न दिल्यामुळे त्यांचे अपहरण करून त्यास मारहाण केली. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवारी सकाळी या चारही आरोपींना घेऊन पोलिस काळा खडक परिसरात दाखल झाले. पोलिसांनी काळा खडक परिसरात आरोपींना बेड्या घालून त्यांना बाजारपेठ परिसरातून रस्त्याने चालवत नेत त्यांची धिंड काढली. दरम्यान  त्यांना चांगला चोपही दिल्याचे समजते. आपल्याच भागात नेहमी दहशत माजविणार्या आरोपींची रस्त्याने काढलेली ही धिंड पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने जमा झाले होते. पोलिसांनी केलेल्या या थेट कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

SCROLL FOR NEXT