pune sakal
पुणे

Pune : तोतया पोलीस अधिकाऱ्याची पोलीस चौकीत पोलीसांनाच अरेरावी

संदिपराजे गणतराव निंबाळकर असे या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे

राजेंद्र लोथे

पुणे : अदखलपात्र तक्रार दाखल असलेल्या नागरिकाला तुमच्या तक्रारीत मदत करतो मात्र मला मोबदला द्यावा लागेल असा फोन करणाऱ्या व त्यांनतर प्रत्यक्ष पोलीस चौकीत येवून अरेरावी करत रूबाबात आलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला खेड पोलीसांनी गजाआड केले आहे, संदिपराजे गणतराव निंबाळकर असे या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

आपण पोलीस निरीक्षक असुन आपले थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहे असे फोनवरून सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रूबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली आहे, संदिपराजे गणतराव निंबाळकर असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस सुनिल ज्ञानेश्वर बांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन सिताराम गायकवाड, रा विश्वकल्याण सोसायटी, शिरोली यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल असून त्यांना शुक्रवार ता. १५ रोजी तोतया निंबाळकर याचा फोन आला की मी तुम्हाला तुमच्या तक्रारीत मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल. गायकवाड यांनी खेड पोलिसांना याबाबतीत माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. तोतया निरीक्षकाला फोनवर विचारणा करून पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.

दुचाकीवर पुढे-मागे पोलीस लिहिलेल्या आणि पोलिसांचा अधिकृत लोगो असलेल्या दुचाकीवर रूबाबात हे महाशय पोलीस ठाण्यात हजर झाले. मात्र चौकशीअंती पोलिसांनी त्याचा खरा चेहरा समोर आणला. आपल्याकडील बनावट ओळखपत्र दाखवत मी नागपूर म्ध्ये ट्रेनिंग घेऊन प्रथम पोलीस निरीक्षक व नंतर सहा वर्षे आजारी रजा घेऊन थेट पोलीस निरीक्षक झाल्याचे त्याने पोलीस निरिक्षक सतिशकुमार गुरव यांना सांगितले होते. अखेर चौकशीत हा तोतया निघाला आणि पोलिसांनी त्याला गजाआड केले.

खोलवर चौकशी केली असता एका अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या बायकोचा हा भाऊ म्हणजेच मेहुणा असल्याचे समजते आहे. याचाच गैरफायदा घेवून तोतया निरीक्षकाने आणखी कोणकोणत्या तक्रारीत किती जणांना मदत केली, किती माया गोळा केली याचा शोध खेड पोलिस घेतीलच मात्र अधिकृतपणे पोलिसां कडुन या तोतयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नातेसंबंध असल्याचे स्पष्टपणे सांगीतले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांत! विदर्भ समुद्री मार्गाने मुंबईशी जोडला जाणार; पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Jalgaon Sports Complex : जळगाव जिल्हा क्रीडासंकुलाला ऑलिंपिक टच! खानदेशातला पहिला अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक साकारणार

D Mart Barcode Scam : डी मार्टच्या बारकोडमध्ये स्कॅम करायचा, कंपनीतील कर्मचाऱ्याने लावलं होतं कामाला...; पण एक चूक पडली महागात

Video: ट्रॅक्टरवर वाजलं 'चुनरी-चुनरी' गाणं.. फॉरेनरसुद्धा थिरकल्या; व्हिडीओ तुफान व्हायरल

Latest Marathi Breaking News : पंढरपूरमध्ये तीन दुकानांना मोठी आग

SCROLL FOR NEXT