Pune Police Operation sakal
पुणे

Pune Police Operation : गुन्हेगारांना ‘हॉटस्पॉट’मध्ये गाठणार ; पुणे पोलिसांचा ‘रोडमॅप’ तयार,एकत्रित कोम्बिंग ऑपरेशन

शहरातील ‘स्ट्रीट क्राइम’ आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे वास्तव्य असलेले १८ ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत. ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी एकाच वेळी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस एकत्रित कोम्बिंग ऑपरेशन राबवतील, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील ‘स्ट्रीट क्राइम’ आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे वास्तव्य असलेले १८ ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत. ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी एकाच वेळी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस एकत्रित कोम्बिंग ऑपरेशन राबवतील, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात विविध भागांत घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आणि गुन्हेगारांचे वास्तव्य या बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेकडून १८ ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत. बेकायदा शस्त्र बाळगणे, अमली पदार्थांची तस्करी, अल्पवयीन गुन्हेगारांकडून वाहनचोरी, वाहनांची तोडफोड, सोनसाखळी हिसकावणे, जबरी चोरी करणाऱ्यांची कुंडलीच तयार केली आहे.

सराईत गुन्हेगारांसह भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांवरही पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याऐवजी आता गुन्हेगारांचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणांपैकी एका-एका ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येईल. गुन्हे शाखेचे सर्व युनिटमधील पोलिस आणि स्थानिक पोलिसांकडून एकत्रित कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जाईल. जेणेकरून गुन्हेगार पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाहीत. जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील बहुतांश आरोपी स्थानिक आहेत. कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याबाबत नियोजन केल्याचे अतिरिक्त आयुक्त बलकवडे यांनी सांगितले.

मोबाईल, दुचाकी चोरी, वाहनांची तोडफोड अशा गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘रोडमॅप’ तयार केला आहे. नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वासाची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

- शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

परिमंडळनिहाय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

परिमंडळ एक- २, परिमंडळ दोन- ३, परिमंडळ तीन- ४, परिमंडळ चार- ५ आणि परिमंडळ पाचमध्ये ४ हॉटस्पॉट निश्चित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT