tender sakal
पुणे

Fire Brigade Tender : अग्नीशामक दलाच्या निविदेसाठी राजकीय दबाव

निविदा प्रक्रिया सुरू झालेली असताना राज्यातील एका मंत्र्याच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी खटाटोप सुरू.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोहियानगर येथील अग्निशामक दलाची धोकादायक झालेली इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झालेली असताना राज्यातील एका मंत्र्याच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी खटाटोप सुरू आहे. त्यामुळे प्रशासक काळातील निविदामंधील राजकीय दबावाची महापालिकेत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाची इमारती जुनी झाली आहे. ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधली जाणार असून, त्यासाठी सुमारे २२ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेत पात्र होण्यासाठी इमारत बांधल्याचा दाखल्यांसह इतर अटी व शर्ती ठेकेदारांनी पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

५ ठेकेदारांचे प्रस्ताव आले असून, त्यांचे अ पाकिट उघडून त्यांचे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (ता. २४) कोणता ठेकेदार पात्र, अपात्र होणार यासाठी बैठक घेतली जाणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत राज्यातील एका मंत्र्याच्या मर्जीतील ठेकेदारास पात्र ठरविण्यासाठी माजी पदाधिकाऱ्याने दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

रेल्वे विभागाकडे केलेल्या कामाचे दाखले जोडले आहेत, चॅनलिंग व पुलाचा कामाचे दाखले जडले आहे, त्यामध्ये बांधकाम दिसून येत नाही. २०२०-२१ या वर्षीचे ताळेबंद जोडले नाही, त्यामुळे निविदेत पात्र ठरत नाही यासह इतर आक्षेप घेतले आहेत, तरीही ‘अंकल’च्या ठेकेदारासाठी खटाटोप सुरू आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा प्रशासक काळातील निविदा प्रक्रियेतील राजकीय दबावाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत भाष्य करण्यास महापालिकेतील अधिकाऱ्यांनी नकार दिला.

पॅकेज चार प्रमाणे दबाव

पथ विभागातर्फे शहरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा काढल्या. त्यातील पॅकेज चार निविदेमध्ये नियमांचे उल्लंघन करून मर्जीतील ठेकेदार काम मिळवून देण्यासाठी माजी सभागृह नेते, आमदार, माजी नगरसेवक सक्रिय झाले होते. त्याविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर अखेर ही निविदाच रद्द करावी लागली. पॅकेज चार प्रमाणे तीच मंडळी पुन्हा या निविदेत सक्रिय झाली असून, त्यांच्याकडून दबाव टाकला जात आहे. याविरोधात प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT