पुणे

लोकसंख्या ३४ लाख; वाहने ३६ लाख

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी पुणेकर स्वत:च्या वाहनाला पसंती देत आहेत. त्यामुळे प्रत्येक पुणेकराकडे किमान एक वाहन असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. शहराची लोकसंख्या ३४ लाख, तर वाहनांची संख्या ३६ लाख अशी परिस्थिती आहे. कोलमडलेले वाहतूक नियोजन, वाहतूक कोंडी आणि इंधनाचे दर वाढूनही पुणेकरांनी गेल्या वर्षात वाहन खरेदी करताना ‘टॉप गिअर’ टाकल्याचे यानिमित्ताने स्पष्ट आहे. 

शहरात गेल्या वर्षभरात मार्च २०१८ अखेर दोन लाख ९० हजार  नवी वाहने रस्त्यांवर आली आहेत. परिणामी, एकूण वाहन संख्येने ३६ लाखांचा आकडा ओलांडला आहे. त्यात, दुचाकींची संख्या २७ लाखांहून अधिक आहे. शहराची लोकसंख्या ३४ लाख दोन हजार इतकी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वाहनसंख्या अधिक असून प्रत्येक व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक म्हणजे, १.०७ असे वाहनाचे प्रमाण आहे. त्याचा अर्थ काही पुणेकरांकडे दोन वाहने आहेत. शहराच्या पर्यावरण अहवालातून (२०१७-१८) ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे.

गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच एवढ्या नव्या वाहनांची नोंदणी झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून आढळून आले आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात ‘पीएमपी’ सक्षम करीत, बीआरटी आणि महिलांसाठी स्वतंत्र बस व्यवस्था आदी प्रयोग राबविण्यात येत आहेत. मात्र, पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा स्वतःच्या वाहन खरेदीलाच पसंती देत आहेत. त्यामुळे दरवर्षी खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षात वर्षाला साधारणत: दीड ते पावणेदोन लाख नव्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी होत होती; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत हा आकडा आणखी वाढल्याचे दिसून आले. याच काळात इंधन दरवाढ होऊनही वाहन खरेदीचा वेग मंदावला नसल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup मधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड मायदेशी मग आम्हीच भारतात का अडकलो? द. आफ्रिका-वेस्ट इंडिज खेळाडू ICC वर तापले

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Latest Marathi News Live Update : रंगपंचमी निमित्ताने पोलिसांकडून कोल्हापूर-गगनबावडा रोडवर वाहनांची तपासणी

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

SCROLL FOR NEXT