porsche motors pune accident esakal
पुणे

Pune Porsche Accident Bail: पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीची सुटका, 35 दिवसांनी बाल सुधारगृहाबाहेर

Porsche Accident: 19 मेच्या पहाटे पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने नशेत दोन मोटारसायकल स्वार सॉफ्टवेअर अभियंत्यांना आपल्या पोर्शे कारने धडक दिली होती.

आशुतोष मसगौंडे

पुण्यात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी गेल्या काही दिवसांपासून सुधारगृहात आहे. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करत घरी सोडण्याचे आदेश दिले होते.

आज सायंकाळी सुमारे 8 वाजता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुण्यातील बाल सुधारगृहातून सुटका करण्याता आली आहे. त्याला त्याच्या आत्याकडे सोपवण्यात आले आहे.

या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यामुळे पुणे पोलिसांना मोठा झटका बसला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी तपासामध्ये ढिसाळपणा केल्याचे आरोप आजा त्यांच्यावर होत आहेत.

पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार रवीद्र धंगेकरांनी तापस अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही पोलिसांवर टीका केली आहे.

19 मेच्या पहाटे पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने नशेत दोन मोटारसायकल स्वार सॉफ्टवेअर अभियंत्यांना आपल्या पोर्शे कारने धडक दिली होती. ज्यामध्ये दोन्ही अभियंत्यांचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर सुमारे एक महिन्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने अल्पवयीन आरोपीला दिलासा दिला आणि सांगितले की, अपघात दुर्दैवी असला तरी अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात ठेवता येणार नाही. न्यायालयाने बालसुधारगृहाला अल्पवयीन आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले होते.

या अल्पवयीन मुलाचे आई-वडील आणि आजोबा सध्या तुरुंगात असल्याने त्याचा ताबा त्याच्या आत्याकडे देण्यात यावा असेही न्यायालयाने सांगितले होते.

रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला अपघात प्रकरणी सुरुवातीला बाल न्याय मंडळाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीसह जामीन मंजूर केला होता.

या निर्णयामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर, पोलिसांनी पुनरावलोकनाची विनंती केली आणि बाल न्याय मंडळाने मुलाला निरीक्षण गृहात पाठवले होते. त्यानंतर या मुलाच्या आत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पुणे पोर्शे कार अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पीडित कुटुंबाने मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवर बोलून पुण्यातील सर्व बेकायदा पबवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT