Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणात अग्रवाल बाप-लेकाला जामीन; चालकाच्या अपहरणाचा केला होता प्रयत्न

Pune Porsche Accident Latest update : चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी दबाव आणत चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात, बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न करून त्याचा मोबाईल फोन काढून धमकावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला होता.

तक्रारदार चालक हा पोर्श कार अपघात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. आरोपी बापलेकांनी चालकाला धमकावून बंगल्यात डांबून ठेवत अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. तक्रारदाराचे कपडे आरोपींच्या बंगल्याच्या खोलीतून जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपींनी छेडछाड केली असून, आरोपींना जामीन झाल्यास ते पुन्हा पुराव्यात छेडछाड करू शकतात. अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी आरोपींनी त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना जामीन झाल्यास ते पुन्हा तपासात अडथळे आणू शकतात, असा युक्तिवाद करत सरकार पक्षातर्फे जामिनास विरोध करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marleshwar Temple Dress Code : शॉर्ट्स, फॅन्सी जिन्स घालून गेलात तर दर्शन नाही मिळणार! प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थानात 'ड्रेस कोड' लागू, पाहा काय आहेत नवे नियम

IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा पलटवार, भारताचे गोलंदाज झाले गार! २०१५ मध्ये जे घडलं होतं, तसंच होण्याची भीती; गौतम गंभीरला आठवलं तेव्हा नेमकं काय झालेलं...

हे पाहायला तू हवा होतास... इमरान हाश्मीचा 'आवारापन २' पाहून प्रेक्षकांना आठवला 'हा' मराठी अभिनेता; म्हणतात-

आमचे मृतदेह घेऊन जा, वडिलांना मेसेज करून पत्नीसह दोन मुलाची हत्या, नौदलातील जवानानं स्वतःलाही संपवलं; धक्कादायक कारण

Marathi News Live Updates : कनिष्ठ डॉक्टरांनी विद्यावेतन सुधारणा आणि निवृत्तीच्या वयाशी संबंधित मुद्द्यांवरून आंदोलन केले

SCROLL FOR NEXT