Pune Porsche accident esakal
पुणे

Pune Porsche accident: जामीन झाला तरी अल्पवयीन आरोपीला निबंध लिहावाच लागणार! उच्च न्यायालयाने आदेशात नेमकं काय म्हटलं?

एकदा जामीन मिळाल्यानंतरही या अल्पवयीन मुलाला पुन्हा निरीक्षण गृहात पाठविण्याच्या आदेशाविरोधात त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती भारती डांगरे आणि न्यायमुर्ती मंजूषा देशपांडे यांनी बाल न्याय मंडळाने १९ मे रोजी दिलेला जामिनाचा आदेशच कायम ठेवत, उर्वरित सर्व आदेश रद्द करून अल्पवयीन मुलाची निरीक्षण गृहातून सुटका केली.

सनील गाडेकर

पुणेः पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता.२५) रात्री सुटका करण्यात आली आहे. मात्र सुटका झाली असली, तरी बाल न्याय मंडळाने (जेजेबी) सर्वप्रथम जामीन मंजूर करताना घातलेल्या अटी-शर्तींचे पालन मुलाला करावे लागणार आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनेवर त्याला निबंध लिहावा लागणार आहे.

कल्याणीनगर येथे १८ मे च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाच्या भरधाव कार धडक दिल्याने तरुण-तरुणींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुलाला जेजेबीमध्ये हजर केले होते. अपघातानंतर काही तासांत मुलाला साडेसात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

तसेच त्याने ‘रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरचे उपाय’ या विषयावर तीनशे शब्द निबंध लिहावा, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यावर ‘प्रेझेंटेशन’ द्यावे, ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना वाहतूक नियमनाच्या कामकाजात मदत करावी, अशा विविध अटी-शर्ती बाल न्याय मंडळाने घातल्या होत्या. त्यावर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या जामिनाच्या निकालात दुरुस्ती करण्यासाठी पुनर्विचार अर्ज पोलिसांनी केला होता. त्यावर मंडळाने २२ मेला मुलाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळाने सुरक्षिततेचे आणि सुधारणेचे कारण देत या अल्पवयीन मुलाच्या निरीक्षण गृहातील मुक्कामात ५ जून आणि १२ जून अशी दोन वेळा वाढ केली होती.

मुलाच्या आत्याने घेतली होती उच्च न्यायालयात धाव

एकदा जामीन मिळाल्यानंतरही या अल्पवयीन मुलाला पुन्हा निरीक्षण गृहात पाठविण्याच्या आदेशाविरोधात त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती भारती डांगरे आणि न्यायमुर्ती मंजूषा देशपांडे यांनी बाल न्याय मंडळाने १९ मे रोजी दिलेला जामिनाचा आदेशच कायम ठेवत, उर्वरित सर्व आदेश रद्द करून अल्पवयीन मुलाची निरीक्षण गृहातून सुटका केली. अल्पवयीन मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडे समुपदेशन आणि व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरूच ठेवावे लागणार आहेत. या मुलाच्या पुनर्वसनासाठी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्देशांचे पालन त्याच्यामार्फत करण्याची जबाबदारी त्याच्या आत्यावर राहणार आहे, असे आदेशात नमूद आहे.

जामीन मंजूर करताना जेजेबीच्या मंडळाकडून पुष्कळ चुका

अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका राहिल्या आहेत, असा अहवाल या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केला आहे. जामिनाचा आदेश देताना झालेल्या चुका या अहवालात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. जामिनाचा आदेश सुरूवातीला एका सदस्याने दिला असला तरी, दुसऱ्‍या दिवशी दुसऱ्या सदस्याने त्याला संमती दिल्याने नियमांची पायमल्ली झाल्याचे अहवालात नमूद आहे.

या अटींवर झाला होता जामीन

- अपघातावर ३०० शब्दांत निबंध लिहायचा

- १५ दिवस येरवडा पोलिसांवर वाहतूक नियमनाचे काम करायचे

- मंडळ बोलावले तेव्हा मंडळात हजर व्हायचे

- मुलगा वाईट संगतीत जाणार नाही याची पालकांनी काळजी घ्यायची

- व्यसनमुक्तीबाबत मुलाला मुक्तांगणमध्ये समुपदेशन करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT