Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: ते ब्लड सॅम्पल फक्त आरोपीच्या आईचे नाहीत तर.. डॉ पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर

Pune Porsche Accident: डॉ. पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रूग्णालयामध्ये त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता अधिकृतरित्या समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कल्याणानगर अपघात प्रकणात मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रूग्णालयामध्ये त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. ससूनचे डॉक्टर श्रीहरी हरनोळ याने एकूण ३ जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासंबधीचे वृत्त टिव्ही ९ मराठीने दिले आहे.

अल्पवयीन आरोपीच्या आईसह दोन वृध्दांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती समोर आली आहे. आईचे ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक टेस्टसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आरोपीच्या आईवरतीही कारवाईची शक्यता आहे. आरोपीच्या आईची चौकशी झाल्याची माहिती काही वृत्तांद्वारे समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ब्लड सॅम्पल बदलण्याच्या बाबतीतले अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यानंतर हे ब्लड सॅम्पल कोणाचं होतं यासंबधीचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. हे रक्त कोणाचं होतं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. मात्र, आता डॉ. पल्लवी सापळे यांच्या समितीने ससूनमधील चौकशीचा अहवाल बनवला होता, त्यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत.

अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या उद्देशाने ससूनचे डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांनी एकूण तीन जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची बाब समोर आली आहे. त्यामध्ये एका महिलेचे रक्त होते तर दुसरे दोन वृध्द व्यक्तीचे आहे, असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. त्यामुळे हे महिलेचे रक्त अल्पवयीन आरोपीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

याच महिलेचे रक्त पुढे तपासणीसाठी देण्यात आलं होतं. त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या वडीलांच्या रक्तासोबत मॅच झालं नाही. त्याचा डीएनए मॅच झाला नाही. त्यानंतर आरोपीचे रक्त घेण्यात आले आणि ते त्याच्या वडीलांसोबत मॅच झालं.त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे.

त्यानंतर ससूनमधील तिघांना अटक करण्यात आली, या प्रकरणात ज्या-ज्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले त्यांना या प्रकरणाची कल्पना असल्यास त्यांच्यावरतीही अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT