Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: ड्रायव्हर मुंबईत, अग्रवाल कोल्हापुरात...; कल्याणीनगर अपघात प्रकरणी असा दिला पोलिसांना गुंगारा

पुण्यातील आलिशान भरधाव वेगात असलेल्या पोर्शे कारनं धडक दिल्यानं बाईकवरील दोन इंजिनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यातील आलिशान भरधाव वेगात असलेल्या पोर्शे कारनं धडक दिल्यानं बाईकवरील दोन इंजिनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता अनेक नवे खुलासे होत आहेत. आपल्या अल्पवयीन मुलाच्या या कृत्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी बिल्डर विशाल अग्रवालनं त्यांना गुंगारा देत राहिला.

त्यासाठी त्यानं अनेक क्लृप्ता केल्या वारंवार आपलं लोकेशन बदललं पण अखेर पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्याला संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. पाहुयात नेमकं काय घडलं? (Pune Porsche Accident driver in Mumbai Agarwal in Kolhapur how Police making fool)

आपल्या अल्पवयीन मुलाच्या कृत्यानंतर जसं विशाल अग्रवालला जाणीव झाली की आता आपल्याला अटक होणार. त्यानंतर तो पहिल्यांदा पुण्यातील आपल्या फार्म हाऊसवर गेला. त्यानंतर तिथून कोल्हापूरला गेला, इथं तो आपल्या एका मित्राला भेटला त्यानंतर विशालनं आपल्या एका ड्रायव्हरला मुंबईला पाठवलं. कारण पोलिसांना असं वाटायला हवं की तो कोल्हापूरला गेला त्यानंतर तिथून मुंबईला गेला.

पण प्रत्यक्षात विशाल अग्रवाल कोल्हापुरातून आपल्या मित्राच्या कारनं छत्रपती संभाजीनगर इथं गेला. आपला ठावठिकाणा कोणालाही लागू नये, यासाठी त्यानं आपल्या कुटुंबियांना देखील चुकीची माहिती दिली. त्यानं आपण मुंबईला चाललो असल्याचं आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. यानंतर त्यानं आपला मोबाईल स्वीचऑफ केला. त्यानंतर त्यानं संपर्कासाठी नवं सीमकार्डही विकत घेतलं.

पण पोलिसांना विशालच्या मित्राच्या कारमधील जीपीएसमुळं त्याच्या हालचालीचा पत्ता लागला. त्यानंतर पोलिसांनी वेगानं सूत्र हालवत सीसीटीव्ही चेक केले. तसेच विशालनं आपल्या कुटुंबियांना मेसेज केला होता त्या मोबाईलचं लोकेशन तपासलं असताना तो संभाजीनगरच्या एका छोट्या लॉजमध्ये लपल्याचं पोलिसांना कळालं. इथून पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Vs BJP : भाजप युवा नेत्याच्या अंगरक्षकाने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याच्या अंगावर घातली गाडी, दोन्ही गट पोलिस ठाण्यातच अगांवर गेले धावून

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट; ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज

Mohol Municipal Election: 'मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सरासरी 71.72 टक्के मतदान'; उमेदवारांची धाकधूक वाढली

Pune Air Pollution : पुण्याची हवा झाली ‘विषारी’; हवेची गुणवत्ता अत्यंत खराब, वाढत्या प्रदूषणावर तज्ज्ञांचा इशारा

EVM Malfunction:'राहात्यात ईव्हीएम मशिनवरून वाद'; मशिनची पुन्हा चाचणी, बिघाड आढळला अन् उमेदवार संतापले..

SCROLL FOR NEXT