Pune Porsche Car Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

Pune Accident: कल्याणीनगरमध्ये 19 मे रोजी अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत होता, बाल न्याय कायद्यानुसार अल्पवयीन मुलाची त्याच्या पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली जाईल.

आशुतोष मसगौंडे

पोर्श कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना परवानगी दिली. या अपघातात एका अल्पवयीन मुलाच्या गाडीने दोन सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी विरुद्ध तपास करण्याची परवानगी मागितली होती. हा अल्पवयीन आरोपी सध्या सुधारगृहात आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे म्हणाले की, बाल न्याय मंडळासमोर सुनावणी झाली आणि त्यांनी आमची याचिका मान्य केली.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे रोजी अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत होता, असा पोलिसांचा दावा आहे.

बाल न्याय कायद्यानुसार अल्पवयीन मुलाची त्याच्या पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली जाईल.

या अपघाताबाबत समोर आलेल्या नव्या घटना पाहता पोलीस या अल्पवयीन आरोपीचा तपास करणार आहेत.

या घडामोडींमध्ये ससून सामान्य रुग्णालयातील रक्ताच्या नमुन्यांमध्ये कथित हेराफेरीचा समावेश आहे, याप्रकरणी रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती पुढील आठवड्यापर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

यापूर्वी, कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा यांना पुण्यातील न्यायालयाने त्यांच्या चालकाचे अपहरण आणि ओलीस ठेवल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: भाजप सत्तेसाठी वापरतो अन्‌ फेकून देतो: सुषमा अंधारे, ​पेन ड्राईव्ह तयार आहेत म्हणत भाजपला डिवचले!

Road Accident : सर्वाधिक रस्ते अपघात मुंबईत; महामार्ग पोलिसांचा अहवाल

Ashoka Chakra : शुभांशू शुक्ला यांना ‘अशोक चक्र’

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

कराड तालुका हादरला! चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार;संशयिताकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकी, चौघांवर गुन्हा..

SCROLL FOR NEXT