Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Pune Porsche Accident: या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस एआय आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने संपूर्ण दृश्याचे 'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन' तयार करण्याचा विचार करत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने हे वाहन कार चालक चालवत नसून त्यात तीन मुले होती, जे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कार चालकाला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता.

या अपघातात काही महत्त्वाच्या गोष्टी, घागेदोरे समोर येत असतानाच आणखी एक बाब समोर आली आहे. रविवारी १९ मे रोजी झालेल्या या अपघातात ऑटोचालक अमीन हाही थोडक्यात बचावला होता. न्यूज18 शी बोलताना तो म्हणाला, 'कारमध्ये तीन मुले होती. सगळे मद्यधुंद अवस्थेत दिसत होते. अपघातानंतर तो पोर्शेमधून बाहेर आला आणि या गोष्टीवरून गोंधळ घालू नका, मी तुम्हाला हवे तितके पैसे देतो असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

त्यांनी पुढे सांगितले की, अपघात झाला तेव्हा कारचा वेग खुप जास्त होता. कारचा वेग ताशी 200 किमीपेक्षा जास्त होता. गाडीत बसलेला एक मुलगा पळून गेला होता. पुन्हा काही वेळाने तो परत आला. नंतर पोलिस त्याला देखील सोबत घेऊन गेले. पोलिसांच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पहिली व्हॅन पहिल्या दोन मुलांना घेऊन गेली. यानंतर दुसरी व्हॅन आली आणि पळून गेलेल्या मुलाला घेऊन निघून गेली.

कार चालकाबाबत प्रश्न विचारल्यानंतर अमीन यांनी सांगितले की, कारमध्ये दुसरा कोणताही चालक उपस्थित नव्हता. त्यांच्यासोबत दुसरी कोणती कार देखील नव्हती. या अपघातानंतर जर कारमधी एअरबॅग उघडल्या नसत्या तर अपघातानंतर ते पळून गेले असते.

पोलिस एआयची मदत घेणार आहेत

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस एआय आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने संपूर्ण दृश्याचे 'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन' तयार करण्याचा विचार करत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की अशा प्रकारचे एआय तंत्रज्ञान अद्याप अपघात स्थळांच्या डिजिटल परिवर्तनासाठी वापरले गेले नाही.

अधिकाऱ्याने 'पीटीआय-भाषा'ला सांगितले की, 'काही एआय सिम्युलेटेड मॉडेल्स आणि कोअर सॉफ्टवेअर आहेत, ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज, घटनास्थळाचा फोटो किंवा चित्र टाकल्यास त्यांच्या मदतीने ते त्रिमितीय चित्र तयार करू शकतात किंवा 3D 'वॉक-थ्रू' 'बनवू शकतो.' अपघात स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून पोलिसांनी अल्पवयीन आपोरीचे फोटो जमा केले आहेत ज्याचा उपयोग अपघात स्थळाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT