Pune Porsche Accident 
पुणे

Pune Porsche Accident: संपूर्ण अग्रवाल कुटुंब कोठडीत! कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक

Shivani agrawal also arrested: कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला देखील अटक करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला देखील अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणी शिवानी अग्रवाल हिला ताब्यात घेण्यात आलेचे कळत आहेत. अग्रवाल यांची आज चौकशी केली जाणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी नवी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या आईने रक्त दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात तिचा काही सहभाग आहे का? याचा तपास केला जाणार आहे. यापूर्वीच पोलिसांनी शिवानी अग्रवालची चौकशी सुरु केली होती. आता तिला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलल्याप्रकरणी पोलिसांनी याआधीच ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर या दोघांनी पैसे किंवा दबावापोटी आरोपीचे रक्त बदलल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी चौकशीसाठी एक समितीची स्थापना करण्यात आली होती. यात या दोघांनी मिळून रक्त नमुन्यात फेरफार केल्याचं समोर आलं होतं.

कल्याणीनगर अपघात प्रकरणाला दररोज नवीन वळण मिळत असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी सुरुवातीला आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर चालकाला धमकवल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला देखील अटक करण्यात आली. कोर्टाने या दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची याप्रकरणात चौकशी सुरु आहे.

आरोपी अल्पवयीन तरुण हा बाल सुधारगृहात आहेत. त्याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी परवानगी मागितली होती. याला बाल सुधार मंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आरोपीची आज दोन तास चौकशी केली जाणार आहे. यामधून काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपीने भरधाव पोर्शे चालवत दोघांना उडवलं होतं. यात जोडप्याचा जागीच मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT