Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident : ...म्हणून विशाल अग्रवालला सात दिवसांची कोठडी द्या! सरकारी वकिलांची कोर्टात मागणी

Pune Porsche Accident : सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.

रोहित कणसे

पुणे : शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणी अल्पवयीन तरुणाला शिक्षा मिळावी अशी भावना सर्व स्तरातून सुरू आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. (Pune Porsche Accident Latest News)

सरकारी वकिलांचा युक्तीवाद

यावेळी सरकारी वकिल यांनी ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला असा प्रश्न उपस्थित केला. तसेच विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार का झाले?

ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? असे प्रश्न विचारले. यासबोतच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत, तसेच या सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.

ड्रायव्हर ने जबाब दिला आहे की त्याने गाडी चालवायला मागितली होती, पण अल्पवयीन तरुणाने तू शेजारी बस असं सांगितलं. गाडीचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं मग गाडी रस्त्यावर आलीच कशी? असा युक्तिवाद सरकारी वकीलकांडून करण्यात आला.

विशाल आग्रवाल यांच्या वकिलाचा युक्तीवाद

दरम्यान विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी यावेळी युक्तिवाद करताना आरोपी फरार नव्हता, ४१ A ची नोटीस दिली नव्हती असे सांगितले. यासोबतच त्यांनी पुण्यातील ते पब हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केले आहेत पोलिसांनी नाही. तिथे जप्त केलेल्या सर्व सामग्री सुरक्षित आहेत. आरोपीला पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तीवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT