Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या जामीनाच्या आदेशावर सही देणारे जज नव्हे तर...; याप्रकरणातही चौकशीची शक्यता

Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीला जामीन देणारे न्यायाधिश त्या दिवशी खासगी सदस्य होते. खासगी सदस्य असलेल्या न्यायाधिशांची जामीनाच्या आदेशावर सही आहे. जामीन देणाऱ्या त्या खासगी सदस्यांच्या चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नियमित कोर्टातील न्यायाधिश गैरहजर असताना अल्पवयीन आरोपीचा जामीन झालेला आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन देणारे न्यायाधिश त्या दिवशी खासगी सदस्य होते. खासगी सदस्य असलेल्या न्यायाधिशांची जामीनाच्या आदेशावर सही आहे. जामीन देणाऱ्या त्या खासगी सदस्यांच्या चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

पुणे अपघात प्रकरणात नियमित कोर्टाचे न्यायाधिश गैरहजर असताना अल्पवयीन आरोपीचा जामीन करण्यात आला होता. अल्पवयीन आरोपीला जामीन देणारे न्यायाधिश त्या दिवशी खासगी सदस्य होते. खासगी सदस्य असलेल्या न्यायाधिशाची जामीन अर्जावर सही आहे. सही देणाऱ्या या सदस्यांची या प्रकरणात चौकशीची शक्यता आहे, कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणी अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. या संबधीचे वृत्त टिव्ही ९ मराठीने दिले आहे.

अपघात झाल्यानंतर काही तासांमध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. आत्तापर्यंत आरोपीला अनेकदा वाचवण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. या जामीन प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप आहे का हे तपासले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले; अमितेश कुमारांचा खुलासा

कल्याणीनगर अपघाताप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे.

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे ब्लड गोळा करण्यात आले होते, ते दुसऱ्या व्यक्तीचे होते. तेच ब्लड फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. आरोपीचे ब्लड सॅम्पल ससूनच्या डॉक्टरांनी घेऊन ते डस्टबीनमध्ये फेकले. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले, असा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे.

श्रीहरी हरलोर यांनी ब्लड सॅम्पल घेतले आणि रिप्लेस केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. अजय तावरे याला देखील अटक करण्यात आली होती. तावरे याच्या आदेशानेच हरलोर याने काम केले आहे. आम्हाला शंका असल्याने आरोपीचे ब्लड सॅम्पल आम्ही औंधच्या हॉस्पिटलला देखील पाठवले होते, असं आयुक्त कुमार म्हणाले.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miss Universe 2026: भारताची १९ वर्षीय सौंदर्यवती यंदा 'मिस युनिव्हर्स'च्या मुकुटावर नाव कोरणार? जाणून घ्या काजियाचा प्रवास

तीन महिन्यांत चांदी तब्बल १ लाखांनी स्वस्त! आता भाव आणखी कोसळणार की उसळी घेणार?

IND W vs SA W: दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या ODI, T20I अन् Test सामन्यांसाठी संघ जाहीर; लॉरा वूल्फार्ट कर्णधार

जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा संशय! मृतदेहाजवळ नारळ, लिंबू, अंडी अन् दारूची बाटली, घटना CCTV त कैद

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २१ नोव्हेंबर २०२६ ते २७ नोव्हेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT