Pune Porsche Accindet sakal
पुणे

Pune Porsche Accident: पोलीस कोठडीत अस्वच्छतेमुळे त्रास होतोय, शिवानी अग्रवालची तक्रार

Shivani Agarwal Pune Porsche Accidnet: शिवानी हिला फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारातील कोठडीत (लॉकअप) ठेवण्यात आले आहे |Shivani has been kept in a lockup on the premises of Faraskhana police station

सकाळ वृत्तसेवा

Pune News: रक्त नमुने बदलल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या शिवानी अग्रवाल हीने पोलिस कोठडीत अस्वच्छतेमुळे त्रास होत आहे, अशी तक्रार बुधवारी न्यायालयात केली. पोलिस कोठडी सुनावल्यानंतर शिवानी हिला फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारातील कोठडीत (लॉकअप) ठेवण्यात आले आहे.

कोठडीत अस्वच्छता आहे. अस्वच्छतेमुळे त्रास होत असल्याची तक्रार शिवानीने न्यायालयात केली. तिच्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली. वकिलांमार्फत न्यायालयात तक्रार नोंदवावी, असे आदेश देण्यात आले आहे.

याच गुन्ह्यात ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबर्इने दोघांना कारणे दाखवा नोटीस पाठवून सात दिवसाच्या आत म्हणणे मांडायला सांगितले आहेत.

डॉ. हाळनोर यांच्यावतीने बाजू मांडतांना ॲड ऋषिकेश गानू यांनी न्यायालयात सांगितले की, डॉ. हाळनोर यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कारणे दाखवा नोटीस मंगळवारी मिळाली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी डॉ. हाळनोर यांना कागदपत्रांची गरज असून ही कागदपत्रे ही बीजे मेडिकल येथील खोलीतील आहेत.

ही खोली सील करण्यात आली आहे. तसेच मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यातील कागदपत्रे मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, बी. जे. मेडिकल येथील डॉ. हाळनोर यांची खोली पोलिसांनी नाही तर ससून प्रशासनाने सील केली आहे.

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT