Dr. Ajay Taware Arrested News sakal
पुणे

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार! ससूनच्या दोन मोठ्या डॉक्टरांना अटक

Dr. Ajay Taware Arrested News : पुण्यातील रस्ता अपघात सतत चर्चेत असतो. याप्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. ब्लड रिपोर्ट महत्वाची माहिती समोर आली आहे.

Sandip Kapde

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन डॉक्टरांवर कारवाई केली आहे. ससुनचे डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

पुणे अपघात प्रकरणात आरोपीचा ब्लड रिपोर्ट सुरुवातीपासून चर्चेत  आहे. पोलिसांना ब्लड रिपोर्टबाबत माध्यमांनी देखील अनेक प्रश्न विचारले आहेत. आरोपीने मद्य प्राशन केले होती की नाही, हे  ब्लड रिपोर्टमधून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट महत्वाचा आहे. Dr. Ajay Taware Arrested News

कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुणे पोलिसांनी ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ससून जनरल हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी शनिवारी चालकाचे अपहरण करणे, त्याला धमकावणे आणि चालकाला गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक करण्यात आली होती.त्याचबरोबर या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT