पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी अलिशान कारने दोन दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामिन मिळाला आहे. तर त्याचे वडिल बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे.
दरम्यान आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली.
पोलीस आयुक्तांच्या या पत्रकार परिषदेत आणखी एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती दिली. ते म्हणाले की, अपघातातील मृतांचे नातेवाई आणि मित्रांना धमकावल्याचे प्रकार आमच्या कानावर आले आहेत.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "या अपघातातील मृतांचे नातेवाईक आणि मित्रांबरोबर वाईट वागणूक आणि त्यांना धमकी दिल्याचे काही प्रकार आमच्या कानावर आले आहेत. याप्रकरणी आता आम्ही चौकशी सुरू केली आहे. मात्र, त्यांना धमकावल्याची तक्रार नातोवाईकांनी आतापर्यंत केलेली नाही. मृतांच्या नातेवाईकांशी वाईट वागणूक आणि या प्रकरणातील आरोपींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे."
अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असता, त्यांनी त्याला जामीन मंजूर केला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) भेट देऊन वाहतूक नियमांचा अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी आरोपीला दिले. तसेच त्याला रस्ता अपघात आणि त्यांचे उपाय या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले आहे.
कार अपघातात सहभागी असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या वडिलांना मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अल्पवयीन मुलांना दारू दिल्याप्रकरणी दोन बारच्या तीन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. कोसी रेस्टॉरंटचे मालक प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन काटकर आणि हॉटेल ब्लॅकचे मॅनेजर संदिप सांगळे यांना मंगळवारी अटक करण्यात आली.
सोमवारी, एका बारचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात अल्पवयीन मद्यप्राशन करताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.