Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: त्या रात्री मुलाला.. विशाल अग्रवालने पोलीस कोठडीत दिली मोठी कबूली

Vishal Agrawal: पुणे पोलिसांनी त्याला शोधून काढत संभाजीनगरमधून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता विशाल आग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठीडी सुनावली होती.

आशुतोष मसगौंडे

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघाताताली अल्पवयीन आरोपीच्या बापाने म्हणजेच विशाल आग्रवाल याने पोलीस कोठडीमध्ये कबूली दिली त्याने अपघाताच्या रात्री अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली.

या अपघाताप्रकरणी मुलाला जामीन मिळाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक असलेला विशाल अग्रवाल फरार झाला होता. मात्र, पुणे पोलिसांनी त्याला शोधून काढत संभाजीनगरमधून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता विशाल आग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठीडी सुनावली होती.

पोलीस कोठडी दरम्यान पुणे पोलिसांनी विशाल आक्रवालची या प्रकरणी कसून चौकशी केली. या चौकशी वेळी विशाल अग्रवालने अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली असल्याचे म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही कार 17 वर्षीय अल्पवयीन तरुण चालवत होता, जो पूर्णपणे दारूच्या नशेत होता.

न्यायालयाने या अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती आणि त्याची सुटका केली होती. नंतर वाद वाढत गेल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करून त्यांची रवानगी बाल निरीक्षण गृहात केली. तर पोलिसांनी आरोपीच्या वडिलांसह चौघांना अटक केली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला आलिशान कारने दोन लोकांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवावा की नाही हे बाल न्याय मंडळ ठरवेल, असे आरोपीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले.

नुकतेच पुण्यात पत्रकारांना माहिती देताना, आरोपीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, “ज्युवेनाइल जस्टिस ऍक्टमध्ये आरोपी चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ (CCL) हा अल्पवयीन मानायचा की प्रौढ हे ठरवण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास ९० दिवस लागतात.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ होणार; हवामान विभागाचा अंदाज

Pandharpur News: कॉरिडॉरविरोधात पंढरपुरात कडकडीत बंद; तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’च्या घोषणा!

युद्धात अडकलेल्यांची विमान कंपन्यांकडून लूट, ३० हजारांच्या तिकिटासाठी मोजावे लागतायत १.२० लाख

Kolhapur Zilla Parishad : बेकायदेशीर वृक्षतोड केला अन् सरपंचपद घालवून बसला, विभागीय आयुक्तांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिला आदेश

SCROLL FOR NEXT