Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण? किती आहे संपत्ती  sakal
पुणे

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण? किती आहे संपत्ती

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल नक्की कोण आहे? जाणून घ्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. १९ मेच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटीजवळ भरधाव ग्रे रंगाच्या आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये अनिष अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध (वय १७ वर्षे आठ महिने) गुन्हा दाखल केला आहे. त्याला रविवारी न्यायालयाने जामीन दिला. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यासाठी दिल्याने आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहे.

अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण आहेत?

ब्रम्हा कॉर्प ही कंपनी विशाल अग्रवाल सांभाळतात. ५० वर्षीय विशाल अग्रवाल हे ब्रम्हा उद्योग समूहात महत्त्वाच्या पदावर आहेत. विशाल अग्रवाल हे ब्रम्हा कॉर्पचे अध्यक्ष आहेत. विशाल अग्रवाल यांना अलिशान गाड्यांची मोठी आवड असल्याची माहिती आहे. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता ६ कोटी १ लाख २० हजार इतकी आहे. याबाबतची माहिती 'एबीपी माझा'ने दिली आहे. (Who is Vishal Agarwal Pune Accident Case)

रिअल इस्टेट क्षेत्रात विशाल अग्रवाल यांचे मोठे नाव आहे. ब्रम्हा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संचालक आहेत.

ब्रम्हा कॉर्पने पुण्यात आणि मुंबईत दोन हजाराहून अधिक इमारतींची निर्मीती केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध सनसिटी प्रोजेक्ट ब्रम्हा कॉर्पचाच आहे. 2003 साली हा प्रोजक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर ब्रम्हा कॉर्पचे नावं मोठे झाले. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात त्यांचे सर्वाधिक प्रोजेक्ट्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT