Porsche Car Accident update esakal
पुणे

Porsche Car Accident: पोर्शे कार अपघात प्रकरणी आमदार टिंगरेंची तीन ते चार तास चौकशी!

Porsche Car Accident MLA Sunil Tingre : पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव पोर्शे मोटारीने दुचाकीला धडक दिली होती. त्यात आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

अनिस सावळे

पुणे: पोर्शे मोटार अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव पोर्श मोटारीने दुचाकीला धडक दिली होती. त्यात आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आमदार टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांवर दबाव आणला, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यावर टिंगरे यांनी त्यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी दिले होते.

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी टिंगरे यांची तीन ते चार तास चौकशी केली होती. तसेच, या प्रकरणात टिंगरे यांची कोणतीही भूमिका नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात नुकत्याच एका कार्यक्रमात केला होता.

पोर्शे मोटार अपघात प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून टिंगरे यांच्याकडे चौकशी केली होती. साधारण एक महिन्यापूर्वीच ही चौकशी झाली. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला होता.

-अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

IND vs SL 1st Test: गंभीरने त्याला राखून ठेवलं, चेंडू जुना होताच गोलंदाजीला आणलं! १४६ धावांची भागीदारी तोडली; कोण आहे तो?

खराब अन्न मिळालं? आता QR कोड स्कॅन करा, फोटो-व्हिडिओसह तक्रार करा, FDA चा मोठा निर्णय, नेमकी सुविधा काय?

Income Tax Office Fire: धुराचे लोट अन् कर्मचाऱ्यांची धावपळ, आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

Marathi News Live Updates : नागपूरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस

SCROLL FOR NEXT