Pune Porsche Car Accident Esakal
पुणे

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

Pune Porsche Car Accident: पबमध्ये जात दोन ते तीन तासांत तब्बल ४७ हजार रुपयांचे मद्यपान करीत रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत पार्टी करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाला आता रोज सकाळी साडेसहाच्या आधीच उठावे लागत आहे.

सनिल गाडेकर

पुणेः पबमध्ये जात दोन ते तीन तासांत तब्बल ४७ हजार रुपयांचे मद्यपान करीत रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत पार्टी करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाला आता रोज सकाळी साडेसहाच्या आधीच उठावे लागत आहे. बाल सुधारणागृहात असलेल्या दिनचर्येमुळे त्याची झोप उडाली असेल अशी परिस्थिती सध्या आहे.

महागडी मोटार चालवताना दुचाकीला भरधाव वेगात धडक दिल्याने झालेल्या अपघात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यातील अल्पवयीन मुलाला काही तासांतच जामीन मिळाला होता. बाल न्याय मंडळाने दिलेल्या या आदेशावर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

अपघाताच्या काही दिवसानंतर मुलाचा पाच जूनपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे येथील मुलांचा दिनक्रम काय असतो, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. येथे दाखल होणाऱ्या मुलांच्या सुरुवात सकाळी सहा वाजता होते. तर संध्याकाळी आठच्या सुमारास त्यांची दिनचर्या संपलेली असते.

सकाळी साडेसहा वाजते होते दिवसाची सुरुवात

साडेसहा ते आठ - योगा, व्यायाम आणि प्रार्थना

आठ ते नऊ - नाश्ता

नऊ ते एक - विविध क्लासेस (मुलानुसार वेगवेगळे)

एक ते दोन - जेवण

दोन ते चार - गरज असेल तर समुपदेशन अन्यथा मुले त्यांच्या रुममध्ये असतात

चार ते साडेपाच - मुलांना खेळण्यासाठी पाठवले जाते

साडेपाच नंतर- मुलांना रुममध्ये पाठवले जाते

रात्री सातनंतर - रात्रीचे जेवण आणि त्यानंतर मुले त्यांच्या रुममध्ये असतात

जामिनावेळी सादर होतो अहवाल

सुधारगृहात पाठवलेल्या मुलाची जेव्हा सुटका करायची असेल किंवा त्याला जामीन हवा असेल तर त्याचे सुधारगृहात कसे वर्तन होते. त्याची दिनचर्या कशी होती. त्याचे कशा प्रकारे समुपदेशन करण्यात आले, ही सर्व माहिती असलेला अहवाल अधिक्षक मंडळात सादर करतात. त्यावर त्याच्या जामिनाबाबत किंवा इतर पुढील प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जातो.

बाल सुधारणागृहात असलेल्या रुममध्ये चार ते पाच मुले एकत्रित असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या दिनचर्यावर लक्ष ठेवले जाते. येथे दाखल असलेल्या सर्व मुलांना समान वागणूक मिळेल, याची दक्षता मंडळाकडून घेण्यात येते. ज्या गुन्ह्यानुसार मुले सुधारणागृहात आले आहेत, त्यानुसार त्यांचे समुपदेशन करण्यात येते. बाल सुधारणागृहातून बाहेर पडल्यानंतर चांगल्या प्रकारे आयुष्याची सुरुवात केली, अशी अनेक मुले आहेत.

बाल न्याय मंडळात प्रॅक्टीस करणारे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT