Pune Porsche Crash  Sakal
पुणे

Pune Porsche Crash : पोलिसांकडून 'ससून'मधील महत्त्वाची कागदपत्रं जप्त; पोलिसांच्या जीवावर डॉ. तावरे करायच्या पार्ट्या

कागदपत्रांमधून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. डॉ. अजय तावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मी या प्रकरणात अनेकांची नावं घेणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे बुधवारी सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात तावरेच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

संतोष कानडे

पुणेः पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरीपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मोठी कार्यवाही केली असून रुग्णालयातील महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत.

ससून रुग्णालयातील ज्या डॉक्टर अजय तावरेने अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले आहेत, त्याच्यावर आणखी आरोप होत आहेत. तावरे हा रिपोर्टसाठी पोलिसांकडूनदेखील चिरीमीरी घ्यायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांकडून तो शंभर-दोनशे रुपये घ्यायचा, कुठल्याही हद्दीमध्ये पार्ट्या करायचा आणि बिल मात्र पोलिसांना द्यायचा लावायचा, अशी माहिती पोलिस दलामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, बुधवारी पोलिसांनी ससून रुग्णालयामधून अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी तपासकामाला वेग दिला असून यापूर्वीच ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलेलं आहे. बुधवारी केलेल्या कार्यवाहीमध्ये मुख्य रजिस्टर आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

कागदपत्रांमधून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. डॉ. अजय तावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मी या प्रकरणात अनेकांची नावं घेणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे बुधवारी सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात तावरेच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

पोर्शे कार अपघात प्रकरणात अनेक मोठे लोक गुंतू शकतात, ब्लड रिपोर्ट बदलण्यात आला, पिझ्झा-बर्गर खावू घालण्यात आले. तावरे हा फक्त रक्ताचं सॅम्पल बदलण्यापुरता मर्यादित नाही. जेव्हा तो म्हणतो की मी माझं तोंड उघडेल, याचा अर्थ दहा-बारा वर्षात त्याने काय काय पाहिलं हे समजून घ्यावं, असं अंधारे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT